प्रतिनिधी : नामदेव मंडपे : हृदयरोग तज्ञ डॉ.कृष्णा कोरडे व कलावती सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल ची किमया !!
_परतुर तालुक्यातील दहा वर्षाचा मुलगा ज्याला मागील भरपूर दिवसांपासून दम लागत होता. टू डी इको व तपासण्यांमध्ये असं निदर्शनास आलं की त्यास हृदयामध्ये एक छिद्र (होल) असून त्यामुळेच रुग्णाला प्रचंड त्रास होत होता. डॉ.कृष्णा कोरडे, डॉ.अर्जुन सातपुते व टीमने त्यांना बिना टाक्याच्या शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत आपल्या जालना जिल्ह्यामध्ये प्रथमच अशा प्रकारची शस्त्रक्रिया डॉ.कृष्णा कोरडे व कलावती सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या टीम द्वारे यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. परतुर तालुक्याचे माननीय आमदार बबनराव लोणीकर यांनी आज रुग्णाची भेट घेऊन झालेल्या उपचाराबद्दल माहिती घेतली व हॉस्पिटलला सुद्धा झालेल्या शस्त्रक्रियेबद्दल कौतुक करून शुभेच्छा दिल्या
लहान मुलांवरील हृदयाच्या बिना टाक्याच्या शस्त्रक्रिया या नक्कीच थोड्या किचकट स्वरूपाच्या असतात परंतु रुग्णांच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन आजपर्यंतच्या अनुभवावर व संपूर्ण कलावती हॉस्पिटलच्या टीमवर मला विश्वास होता की ही शस्त्रक्रिया आपण यशस्वीरित्या पार करू शकतो. बिना टाक्याच्या शस्त्रक्रियामुळे रुग्णाला आपण 24 तासातच सुट्टी दिली. अँजिओग्राफी एन्जोप्लास्टी, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया , बायपास, वाल रिप्लेसमेंट , गुडघा व खुबा बदल्याच्या शस्त्रक्रिया अशा अनेक किचकट आजारांवरील उपचार कलावती हॉस्पिटलमध्ये सुरू आहे जेणेकरून रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये किंवा दूर जाऊन उपचार करण्याची गरज पडणार नाही.
डॉ.कृष्णा मदनराव कोरडे(हृदयरोग तज्ञ) कलावती हॉस्पिटल जालना.
येणाऱ्या काळात जालन्यामध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान व नवनवीन उपचार पद्धती कलावती सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये आणण्याचे आमचे प्रयत्न राहील जेणेकरून त्याचा फायदा आपल्या भागातील रुग्णांना नक्कीच होईल
डॉ.अर्जुन सातपुते(हृदयरोग तज्ञ) कलावती हॉस्पिटल जालना.
डॉ.कोरडे व कलावती हॉस्पिटल मार्फत आंतरराष्ट्रीय दर्जाचे व अत्याधुनिक उपचार आपल्या भागातील रुग्णांवर यशस्वीरित्या होत आहेत. रुग्णसेवेच्या या कार्यात त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा. आमदार बबनराव लोणीकर.
