नाशिक : जिल्ह्यात शिक्षणाच्या मोठ्या संधी आहेत. तरुणांना कौशल्यपूर्ण शिक्षण देणाऱ्याही अनेक शैक्षणिक संस्था शहरात आहेत. बेरोजगारांना रोजगार आणि कौशल्यपूर्ण शिक्षण घेतलेल्या तरुणांना स्वंयरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासन, प्रशासन सदैवच तत्पर असते. रोजगार मिळविण्यासाठी तरुणांमध्ये सततच मोठी स्पर्धा असते. अशा परिस्थितीत आमदार सीमा हिरे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेला युवा रोजगार मेळावा स्तुत्य उपक्रम आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. दरम्यान, मेळाव्याच्या माध्यमातून १०६० बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे.
उत्तमनगर येथील भोळे मंगल कार्यालयात आयोजित रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, आयोजक आ. सीमा हिरे, रश्मी हिरे, डिस्टिल एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी प्रा.लि.चे संचालक विनेश मोरे, कौशल्य विकास विभागाच्या अनिसा तडवी, निमा अध्यक्ष आशिष नहार, आयमा अध्यक्ष ललित बूब, प्रदीप पेशकर, श्रृष्टी श्रीवास्तव, निपमचे नितीन पाटील, सुनील सैंदाणे, राजाराम कासार आदी मान्यवर उपस्थित होते. मेळाव्यात १३३८ बेरोजगारांच्या मुलाखती घेऊन विविध कंपन्यांत १०६० तरुणांची निवड करण्यात आली. शिक्षण कधीच पूर्ण होत नसतं. स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर योग्य ते शिक्षण घेतच राहा असे मार्गदर्शन यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी केले.
यावेळी माजी नगरसेवक मुकेश शहाणे, प्रतिभा पवार, अलका आहिरे, भाग्यश्री ढेमसे, रत्नमाला राणे, पुष्पा आव्हाड, दीपाली कुलकर्णी, कावेरी घुगे, श्याम बडोदे, राकेश दोंदे, भगवान दोंदे, रोहिणी नायडू यांच्यासह रवी पाटील, सागर शेलार, गणेश बोलकर, भगवान काकड, अर्चना दिंडोरकर, अमोल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
खरंच रोजगार मिळावे ही आता सध्या काळाची गरज आहे. कारण तरुणांना नोकरीची योग्य माहिती त्यातूनच मिळते. आणि आपल्या नाशिक सारख्या शहरात वर्षाला किमान पाच रोजगार मिळावे झाले पाहिजेत. तेव्हा सगळ्या तरुणांना रोजगाराची संधी मिळेल.
