प्रतिनिधी राजेश दामधर जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालूक्यातील भारज बु येथील.
केंद्रीय प्राथमिक शाळा येथे महिला दिन निमित्त महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावाच्या प्रथम नागरिक सरपंच सौ.शकुंतलाबाई रामचंद्र तेलंग्रे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ता श्रीमती शकुंतलाबाई गायकवाड ,सौ विजयाबाई गणेशराव देशमुख संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जाफराबाद या हजर होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाबाई, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले व मान्यवराचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थिनींनी महिलांच्या सन्मानार्थ विविध गीतावर नृत्य सादर केली. कार्यक्रम सुरु असतांनाच चालता बोलता प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली व विविध बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात महिलांचे विविध खेळ तळ्यात मळ्यात संगीत खुर्ची, गायन उखाणे तसेच महिला मार्गदर्शन असे भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमात महिलांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला व कार्यक्रमाचा आनंद घेतला.स्पर्धेत विजेत्या महिलांना बक्षीस वाटप करण्यात आले सदर मेळावा महिला मेळाव्यासाठी सखी सावित्री समिती माता-पालक संघ, सर्व महिला पालक सर्व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या महिला शिक्षिका श्रीमती अनिता सोनटक्के व श्रीमती मीना इंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच त्यांना शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती यांचे सहकार्य मिळाले.
