सौ.कलावती गवळी फलटणचे प्रांत अधिकारी म्हणून प्रियांका आंबेकर यांनी स्वीकारला पदभार, फलटण तालुक्याला कर्तव्यदक्ष प्रांतअधिकारी मिळाल्या, फलटण तालुक्यांच्या प्रांताधिकारी म्हणून प्रियांका आंबेकर यांची नुकतीच नियुक्ती झाली असून. त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार मंगळवारी स्वीकारला आहे. याप्रसंगी फलटण तहसीलदार अभिजीत सोनवणे निवासी नायब तहसीलदार तुषार देशमुख गुंजवटे फलटण तलाठी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण अहिवळे यांनी त्यांचे स्वागत केले. यापूर्वीचे प्रांतअधिकारी म्हणून कार्यरत असणारे सचिन ढोले यांची मुंबई मंत्रालयात नुकतीच बदली झाली असून. त्यांच्या रिक्त जागेवर प्रांताधिकारी म्हणून प्रियांका आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी फलटणमध्ये एक आगळेवेगळे व फलटण तालुक्यांच्या हिंताचे काम केले त्यांचे कार्यालय नेहमीच सर्वसामान्य नागरिक शेतकरी यांच्या कामानिमिंत्त गर्दीं होत असताना चांगलेच दिसून आले त्यांच्या कामाचे नेहमीच विशेष कौतुक संपूर्ण फलटण तालुकाभर केले जात होते. त्याच धर्तीवर नव्या प्रांताधिकारी देखील कर्तव्यदक्ष प्रांतअधिकारी म्हणून प्रियांका आंबेकर यांना देखील महसूल प्रशासनात कर्तव्यदक्ष आणि सर्वसामान्य नागरिकांना शेतकरी बांधवांना प्रथम न्याय देणाऱ्या महिला अधिकारी म्हणून चांगलेच ओळखले जाते. नव्या प्रांताधिकारीही फलटण तालुक्यांमध्ये चांगलेच काम करतील अशी अपेक्षा सध्या सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
