संपादकीय – दिनांक 11 मार्च 2025 रोजी अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर मु.पो.चिंचोली तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशनचे आरोग्य.दिव्यांग मार्गदर्शन शिबिर पार पडले.मधु तारा वर्धा जिल्हा प्रमुख श्री महेंद्रजी दांगडे यांच्या नियोजनातून पार पडलेल्या शिबिरास ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील असंख्य मान्यवरांनी शिबिरास उपस्थिती दर्शविली.
सरकारच्या योजना मधु ताराच्या राज्यभर चाललेल्या कार्याविषयी मधुतारा प्रमुखांनी मार्गदर्शन केले.
या वेळी मधु ताराच्या संस्थापक प्रमुख विश्वस्त अश्विनीताई गिरडकर यांनी संपूर्ण विदर्भात मधु ताराचे कार्य पोहचावे या साठी प्रत्येकाने सोबत राहून तळागाळातील लोकांसाठी मधु ताराच्या कडीला कडी जोडून कार्य करावे असे नम्र आवाहन केले.
या प्रसंगी चिंचोली गावचे मा.सरपंच दिलीपजी राऊत.पोलिस पाटील श्वेता ताई लोंढे. मा.ग्रामपंचायत सदस्य श्री चंदूभाऊ घाडगे यांनी मधु ताराच्या कार्याला हातात हात घालून काम करू तसेच इतक्या योजना आपण सांगितल्या मधु ताराचे सर्वच क्षेत्रातील कार्य ऐकून प्रभावित आपण झालो असे म्हणले.
भटक्या विमुक्त जातीसाठी कार्य करणारे श्री प्रल्हादभाऊ दांगडे यांची मधु तारा वर्धा उपजिल्हा प्रमुख.बांधकाम व्यावसायिक श्री गजाननजी चिडे यांना हिंगणघाट* *तालुका प्रमुख.श्री अशोकजी झालेकर यांची देवळी तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती पत्र मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे.विश्वस्त अश्विनीताई गिरडकर.वर्धा जिल्हा प्रमुख श्री महेंद्रजी दांगडे.मा.सरपंच दिलीपजी राऊत यांच्या हसते प्रदान करण्यात आले.
अतिशय छान प्रकारे मार्गदर्शन केल्या बद्दल पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी समाधान व्यक्त करत मधु तारा फाऊंडेशनचे आभार मानले व लवकरच मोठ्या प्रमाणात मधु ताराचे कार्यक्रम आरोग्य शिबीर लावण्यात येईल असे नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले.
