आदित्य चव्हाण – विश्रामबाग पोलीस ठाणे गुरनं. ३८८/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३, कलम ३०३(२) अन्वये दिनांक ३०/११/२०२४ रोजी पहाटे ०२/०० ते सकाळी ०९/०० वाजताचे दरम्यान रेबल फुड, क्लाऊड किचन सर्वे, ४५७, शनीवार पेठ, पुणे येथील किचनचे समोर पुणे येथे फिर्यादी यांनी त्यांची बजाज कंपनीची सीटी १०० ही मोटार सायकल पार्क केली असता अज्ञात इसमाने चोरुन नेल्याने गुन्हा नोंदविला आहे. दाखल गुन्हयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे, व पोलीस अंमलदार यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशीत केले होते. दाखल गुन्हयाचे तपासात विश्रामबाग पोलीस ठाणे तपास पथकातील अंमलदार मयुर भोसले, आशिष खरात व साताप्पा पाटील यांनी तांत्रीक विश्वलेषन व गोपणीय खबरीच्या मदतीने सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार मयुर अनंत डेरे, वय ३५ वर्षे, रा. रा. कसबा पेठ, पुणे याने केल्याचे निष्पन्न करुन त्यास लोणावळा येथुन ताब्यात घेवुन तपास केला असता आरोपीने पुणे शहर आयुक्तालय व पुणे जिल्हयातील ग्रामीण भागात खालील गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. १) विश्रामबाग पोलीस ठाणे, पुणे शहर गुरनं १२९/२०२४ भारतीय दंड संहिता, कलम ३८० २) विश्रामबाग पोलीस ठाणे, पुणे शहर गुरनं २८५/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) ३) विश्रामबाग पोलीस ठाणे, पुणे शहर गुरनं ३८८/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०३ (२) ४) सिंहगड पोलीस ठाणे, पुणे शहर गुरनं ६२६/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) ५) लोणवळा शहर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण गुरनं ३३८/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) ६) लोणवळा शहर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण गुरनं ३९९/२०२४ भा. या.सं.क.३०५ (अ), ३३१ (३),३३१ (४) ७) लोणवळा शहर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण गुरनं ५३८/२०२४ भा.न्या.सं.क.३०५ (अ), ३३१ (३),३३१ (४) अन्वये गुन्हे केल्याचे निष्पन्न करुन आरोपीकडुन ०३ दुचाकी मोटार सायकल, दोन टीव्ही, दोन मोबाईल फोन व एक एच.पी कंपनीचा लॅपटॉप असे एकुण २,२३,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरची कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री. प्रवीणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०१ श्री. संदिपसिह गिल्ल, मा. सहायक पोलीस आयुक्त, श्री साईनाथ ठोंबरे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रामबाग पोलीस स्टेशन श्रीमती विजयमाला पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री अरुण घोडके, पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे, पोलीस अंमलदार अशोक माने, मयुर भोसले, सचिन कदम, गणेश काठे, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, शिवा गायकवाड, अनिष शेख, साताप्पा पाटील, संतोष शेरखाने, नितीन बाबर व सागर मोरे यांनी केलेली आहे.
