प्रतिनिधी शंकर जोग (पुणे) जागतिक महिला दिनानिमित्त हडपसर भेकराई नगर येथे सोनाआई इंग्लिश मीडियम स्कूल आणि सायन्स ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शन आयोजित केला, यावेळी विद्यार्थ्यांनी 110 मॉडेल बनवले, त्यामध्ये सेफ्टी रुल्स, रोड सेंसर, किडनी कार्य, टाकाऊ पासून टिकाऊ कार्यरत करणारे मॉडेल रोबोट, वॉटर सायकल, डोळ्यांचे कार्य करणारे मॉडेल, नैसर्गिक आपत्ती इत्यादी मॉडेल विद्यार्थ्यांनी बनवले,
यावेळी शाळेचे संस्थापक ए एल नरसिंग राव, ट्रस्टी राजलक्ष्मी राव यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले, प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांनी शाळेत गर्दी केली,
यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
