अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात – किरण सोनवणे.
सरकारकडे आमच्या प्रमुख मागण्या.
१) प्रत्येक कामगाराला ज्युनिअर कलाकाराला सर्वांनाच सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे.
२) 600 रुपये परडे +100 रुपये भत्ता असे मिळून 700 रुपये मिळालेच पाहिजे
३) रोजच्या रोज पगाराचे रोख पैसे हातात मिळालेच पाहिजे
४) रेस्ट रूम
महिलां करिता वेगळा / पुरुषांकरिता वेगळा असे दोन रुम मिळालेच पाहिजे
५) ज्युनिअर कलाकारांना 60 साठ वर्षाच्या नंतर सरकारकडून पेन्शन चालू झालीच पाहिजे
६) काम करत असल्या ठिकाणी संडास बाथरूमची स्वच्छता असलीच पाहिजे
७) ठरलेला रेट तोडून कोण जूनियर कामगार काम करत असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे
८) कामाची वेळ ८ आठ तासच पाहिजे त्या व्यतिरिक्त वेळ लागत असेल तर त्याचे वेगळे पैसे द्यावेच लागणार
९) यापुढे कुठलाच कामगार 16 / 18 तास काम करणार नाही
या सर्व वरील मागण्यासाठी आपण एकत्र आलेच पाहिजे आपला विजय झालाच पाहिजे
हीच ती वेळ आहे
हीच ती संधी आहे कुठल्याही कामगाराने कोणाच्या फसवणुकीला बळी पडू नये
आता कामगारांचं
एकच मिशन!!
सिने सृष्टी असोशियन!!
11 मार्च सकाळी 9.30 साडेनऊ वाजता आझाद मैदान
!!जय महाराष्ट्र!!
