एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

महिलांनी आज कर्तृत्वाने सर्व क्षेत्र काबीज केले – नगराध्यक्षा वंदनाताई बोराडे स्त्रीशक्तीचा जागर ; कर्तबगार महिलांचा सन्मान

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज – एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात. 

महिलांनी आज आपल्या कर्तृत्वाने सर्व क्षेत्र काबीज केले आहे.आपण काम करत असलेल्या क्षेत्रात सर्वोच्च काम आपण करावे.आपली स्वतःची नाविन्यपूर्ण ओळख निर्माण करावी. महिला भगिनींनी काम करत समाज व कुटुंबाच्या प्रगतीस हातभार लावावा. असे प्रतिपादन नगराध्यक्षा वंदनाताई वैजनाथ नाना बोराडे यांनी केले. त्या नगरपंचायत व ग्रामीण रुग्णालयात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांत बोलत होत्या. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तुत्वान महिलांच्या कार्याचा गौरव करत उत्कृष्ट कार्याबद्दल 51 महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नगरसेविका यमुनाताई नारायण दवणे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निकिता निकम , लिपिक श्रीमती पल्लवी आळसपुरे , पोलीस हेडकॉन्स्टेबल सविता फुलमाळी , कल्पना डोईफोडे , परिसेविका मीना पालवे,पो.काॅ. सुलाबाई मार्कड यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

यावेळी डॉ.निकिता निकम व त्यांच्या सहकाऱ्यांनी नगराध्यक्ष बोराडे यांचे आभार मानून ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने सत्कार केला. यावेळी डॉक्टर निकिता निकम यांनी बोलताना सांगितले की , महिलांनी स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे , हे स्पष्ट केले. मानसिक , शारीरिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित व्यायाम व संतुलित आहार आणि ताणतणाव व्यवस्थापन यावर भर द्यावा , असे त्यांनी सांगितले. नगरसेविका यमुनाताई दवणे यांनी महिलांच्या सर्व क्षेत्रातील योगदान सविस्तरपणे विशद केले.

 

यावेळी पोलीस हेडकॉन्स्टेबल सविता फुलमाळी यांनी सांगितले की , प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते एका स्त्रीला घर सांभाळून प्रत्येक जबाबदारी पार पाडावी लागते. आयुष्यात प्रत्येक अडचणीला तिला सामोरे जावे लागते , त्यामुळे प्रत्येक पुरुषाने स्त्रीचा सन्मान केला पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल संगीता मांडे , प्रियंका राठोड , अधिपरिचारिका श्रद्धा हजबे , परवीन सय्यद , शिल्पा बोरकर, सिमा शेळके, श्रीमती मयुरी झोड , श्रीमती प्रतिक्षा वाघमारे , विद्या मोरे , दिपाली कल्याणकर , चंद्रकोर राठोड यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link