सहसंपादक : गोपाळ भालेराव : 6 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र पोलीस न्यूज वर्धापन दिन व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रभरातून प्रस्ताव आले होते त्या प्रस्तावातील युवा ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, बाळकडू पत्रकार गणेश महाडिक यांना समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.
पत्रकारिता क्षेत्रातील भरीव कामगिरी करून पत्रकारांच्या सुविधा,अडचणी, समस्या संघटनेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री श्री डॉ. स्वामी शिवलक्ष्मी नंदगिरी आईसाहेब धर्म रक्षक पुरस्कार 2025 व अँड .धनराज वंजारी ज्येष्ठ व्याख्याते व साहित्यीक मा. सहाय्य पोलीस आयुक्त मुंबई ,कार्यक्रमाचे उद्घाटक मा. कॅप्टन एन एस रंघावा,
मा. जीवन विठ्ठल धोत्रे वर्किंग जनर लिस्ट ऑफ इंडिया दिल्ली सदस्य, मा. शंकर गुजर वरिष्ठ तुरुंग अधिकारी, मा. उपचंद लालासो शेलार महाराष्ट्र न्यूज 24 मुख्य संपादक तथा लघु व कुटिरोद्योग विकास प्रकल्प प्रशिक्षक,
प्रमुख उपस्थिती पोलीस सौ.प्रणाली महादेव भोसले, सौ .मुक्ता प्रकाश लोखंडे, सौ. वनिता चंद्रकांत कदम, सौ .शितल अनिल दनाने, सौ. अनिताताई महालिंग राऊत विद्यमान महिला सरपंच आसु, मा. महालिंग प्रभू राऊत धाराशिव जिल्हा उद्योजक ,मा.शशिकांत खुणे उपसरपंच आसु ,मा. श्रावण लक्ष्मण गणगे ग्रामपंचायत सदस्य , मा.बिभीषण नाना खुणे समता परिषद धाराशिव जिल्हा अध्यक्ष, पै. अतुल भैया कुंजीर पुणे जिल्हा शिरूर हवेली युवा अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ ,मा. रवी भाऊ बोरुडे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष ग्राहक संरक्षण परिषद,सौ.संपना माळी शिवणकर संस्थापक अध्यक्ष पृथ्वी फाउंडेशन, मा. संतोष शेठ कांबळे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानव अधिकार भ्रष्टाचार निवारण भारत, मा. चंद्रशेन राऊत उद्योजक, मा. रामभाऊ कर्वे पुणे शहराध्यक्ष आरपीआय आठवले गट हडपसर पुणे ,मा. दिनेश पवार वरिष्ठ पत्रकार तथा प्राध्यापक,
महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 चॅनेल ला 2 वर्षे पूर्ण होत आहेत या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सौ स्मिताताई बाबरे मुख्य संपादिका कथा लघु व कुटीर उद्योग विकास प्रकल्प स्टेट निरीक्षक ,मा. रमेश मामा गणगे महाराष्ट्र उपसंपादक, मा. शुभांगी वाघमारे महाराष्ट्र पोलीस न्यूज डायरेक्टर, मा. यश सप्रे स्वराज्य रक्षक संस्था संस्थापक अध्यक्ष ,यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम मेमाने फर्म ऍग्रो टुरिझम सोलापूर रोड उरुळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
