अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…
शंकर जोग : एसबीसी अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी समाज कल्याण आयुक्त कार्यालय समोर साखळी उपोषण व धरणे आंदोलन :
एसबीसी अन्याय निवारण कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने विविध मागण्यांसाठी पुणे येथील समाज कल्याण आयुक्त कार्यालयासमोरील साखळी उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले,
निवेदनामध्ये राज्य शासन व केंद्र शासन विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना विविध योजनांसाठी ओबीसी व एसबीसी प्रमाणपत्र देण्यात यावे, वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर उच्च शिक्षणात विशेष मागास प्रवर्गासाठी एसबीसी साठी दोन टक्के स्वतंत्र आरक्षण 2025 च्या सञापासून लागू करावे, विशेष मागास प्रवर्गासाठी राज्यात 10 आश्रम शाळा सुरू करावे, एसबीसी विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र तत्काळ द्यावे,
विशेष मागास प्रवर्गासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करावे, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वस्तीगृह सुरू करावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे संचालक ज्ञानेश्वर खिलारी यांची भेट घेऊन एसबीसी अन्याय निवारण कृती समितीचे शिष्टमंडळाच्या वतीने सादर करण्यात आले,
या आंदोलनाचे नेतृत्व एसबीसी अन्याय निवारण कृती समितीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुरेश पद्मशाली, एसबीसी अन्याय निवारण कृती समिती महाराष्ट्र राज्याचे राज्य संघटक आणि पुणे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र कांचनी, यांनी केले या आंदोलनामध्ये संघटनेचे सचिव सुदर्शन बोगा, किशोर चंदावरकर, माजी खासदार आनंद भास्कर रापोलू, नितीन जुजगर, संजीव मंचे, विलास मुद्देल जयकुमार भैरी, अभिषेक सापा, श्रीनिवास सेबी, विजय रच्चेवार, श्रीनिवास बोज्जा, अरुण अमृतवाड, जगन्नाथ भिंगेवार, तिरमलेश पासकंटी, गणेश विद्वे अमोल कोलपेक, गोपाळ येमुल, आदि यावेळी उपस्थित होते.
