संपादकीय : २९ नोव्हेंबरला केजच्या कार्यालयात वाल्मिक कराड, चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांनी बैठक घेतली. याच बैठकीत संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचण्यात आला.
– ८ डिसेंबरला सुदर्शन घुले व चाटे हॉटेल तिरंगा येथे भेटले. त्यावेळी “संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा” असा कराडचा निरोप घुलेने दिला.
– ९ डिसेंबरला संतोष देशमुख यांचे अपहरण व अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आली.
– मारहाण करताना आरोपींनी या घटनेचे १५ व्हिडीओ आणि ८ फोटो काढले.
– संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडीओ कृष्णा आंधळेने ‘मोकारपंती’ या व्हाट्सअप ग्रुपवर शेअर केला, ५-६ जण ते व्हिडीओ पाहत होते.
– व्हिडीओ बनवत असताना सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि प्रतीक घुले हे हसत आणि असुरी आनंद घेत संतोष देशमुखांना मारीत होते.
– जनावरांप्रमाणे मारहाण केल्यानंतर जयराम चाटे याने संतोष देशमुखांचे ओढून कपडे काढतो आणि हात वर करून शर्ट गोल फिरवतो.
– महेश केदार देशमुखांच्या शेजारी उभा राहून सेल्फी घेतो आणि हैवानासारखा हसतो.
– – ‘सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे’ असे देशमुखांनी म्हणावे यासाठी जबरदस्ती केली जात होती.
– हे सर्व नराधम लाथा, बुक्क्या, पाईप आणि वायरने देशमुखांना मारहाण करतात आणि शिवीगाळ करतात.
– संतोष देशमुखांना एका अंतर्वस्त्रावर बसवून पाठीमागून पाठीवर जोरजोराने पाईपने मारहाण होते.
– मारहाणीनंतर देशमुखांच्या शरीरातील रक्त ओघळून त्यांच्या तळपायापर्यंत आले.
– संतोष देशमुख मोठ्याने ओरडत होते तेव्हा महेश केदार त्यांचा व्हिडीओ घेत होता.
– संतोष देशमुख अर्धमेले झाले तेव्हा प्रतीक घुले याने संतोष देशमुख यांच्या छातीच्या दोन्ही बाजूला पाय ठेवून चेहऱ्यावर ल*वी केली.
चार्जशीट सोबत हे फोटो जोडण्यात आले असून, वरील उल्लेख करण्यात आला आहे.
वाल्मिक कराड आणि टोळीचे असे १-२ नाही तर ६६ पुरावे CIDला मिळाले आहेत. त्यानुसार वाल्मिक कराड हत्येचा मुख्य सूत्रधार आहे.
खंडणी, ऍट्रॉसिटी आणि हत्या हि तिन्ही प्रकारने चार्जशीटमध्ये एकत्रित करण्यात आली आहेत.
खंडणीत अडथळा ठरले म्हणून आदर्श सरपंच संतोष देशमुख त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली.
