अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
संपादकीय
पोलिसांची पत्रकांवर दमदाटी दिवसेन दिवस अजब कारभाराचे गजब किस्से
सातारा शिरवळ पोलिसांच्या अजब कारभाराचे गजब किस्से शिरवळ परिसरात दिवसेंदिवस वाढतच आहेत.याच बेलगाम कारभाराने तत्कालीन पोलीस निरीक्षक व काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन नूतन पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांची तडकाफडकी नेमणूक करणेत आली आहे.परंतु भीक नको पण कुत्र आवर अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे.पिसाळवाडी या ठिकाणी दैनिक तरुणभारत पत्रकारास कोणतेही कारण नसताना शिवीगाळ करीत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने पोलीस जनतेच्या रक्षणासाठी का लोकांना धमकावण्यासाठी असा प्रश्न निर्माण होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , दैनिक तरुणभारत शिरवळ प्रतिनिधी भागवत चव्हाण हे आपल्या अंबिका ऍग्रो या पशुखाद्य दुकानासमोर बसले होते. दुकानासमोर लोणंद शिरवळ रस्त्यालगत प्रकाश हनुमंत गायकवाड व संजय हनुमंत गायकवाड यांनी आपल्या भारत गॅस चे दोन सिलेंडर भरण्याकरिता ठेवले होते. ओंकार गॅस एजन्सी या गाडीतून नुकतेच भरलेले दोन सिलेंडर त्या ठिकाणी गाडी निघून गेल्यानंतर पोलिस गाडीतून नलवडे साहेब खाली उतरले .शिरवळ पोलिस ठाणे पोलिस निरीक्षक यशवंत नलवडे यांनी दुकानासमोर येत त्यांना अश्लील शिवीगाळ करणेस सुरुवात केली .त्या सिलेंडर चे फोटो काढून मी तुमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करीन .तुम्हाला सोडणार नाही.भागवत चव्हाण यांनी मी पत्रकार असून येथे माझे पशुखाद्याचे दुकान चालवतो .माझा टाक्यांशी काही संबंध नाही.असे सांगूनही शिवीगाळ करीत बघून घेऊन तसेच गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत तेथून निघून गेले.त्यानंतर सर्व पत्रकारांनी सदर घटनेबाबत शिरवळ पोलीस ठाण्यासह मुख्यमंत्री महोदय , पोलीस महासंचालक मुंबई , विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर , विभागीय आयुक्त पुणे , जिल्हाधिकारी सातारा , पोलिस अधीक्षक सातारा , उप विभागीय अधिकारी फलटण यांना तक्रार दिली आहे.पत्रकार संघटनाही आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत
पत्रकारासच अशी वागणूक मिळून पोलिसांच्या दहशतीला सामोरे जावे लागत असेल तर सर्व सामान्यांना काय वागणूक मिळत असेल असा प्रश्न परिसरातील ग्रामस्थ विचारत आहेत. पोलिस ठाण्यात सुद्धा पत्रकारांबाबत पत्रकारांची मस्ती उतरवली पाहिजे असे अर्वाच्य वक्तव्य केल्याची माहिती एका पत्रकाराने दिली आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय आणि स्मार्ट आणि सौजन्यशील पोलिसिंग हे शिरवळकरांना दिवास्वप्नच ठरेल अशी भावना लोकांत निर्माण होत आहे.
पत्रकार आणि पोलीस म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू. दोन्हीही लोकशाहीचे दोन आधार. पत्रकार हे जनता आणि पोलिस यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. परंतु केवळ काही पोलिसांच्या चुकीच्या पद्धतीमुळे किंवा असंवैधानिक कामकाजामुळे पत्रकारांच्या बातम्यांच्या माध्यमातून पोलिसांना रोशाला सामोरे जावे लागते म्हणून पत्रकारांवर आग पाखड करणे चुकीचे आहे . एखाद्या निरपराधावर अन्याय होत असताना त्याची बाजू मांडने पत्रकाराचे कर्तव्य असते. पण म्हणून जर कोणी अधिकारी पत्रकारांची मस्ती उतरवण्याची मदमस्त भाषा करीत असेल तर पत्रकार संघटना एकत्रितपणे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. पोलीस अधिकाऱ्यांचे हे वर्तन खाकी वर्दीचा दुरुपयोग करणारे आणि पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे. त्यामुळे आम्ही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो .जिल्हा पोलिस अधीक्षक सातारा आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटून संबंधित अधिकाऱ्यांविरोधात जण आंदोलन उभारले जाईल.ऑल मीडिया प्रेस असोसिएशन खंबीरपणे पत्रकारांवरील अन्याय विरोधात संघर्ष करेल .
