अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात.
- सतीश कडू : भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था-जीएसआय नागपूरच्या केंद्रस्थानी क्रिटिकल मिनरलचे उत्खनन – जीएसआय नागपूरचे अतिरिक्त महासंचालक डॉ दिनेश गणवीर यांचे प्रतिपादन.
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था नागपूरचा 175 वा स्थापना दिन साजरा.
केंद्रीय खाण मंत्रालयाच्या अंतर्गत एक प्रमुख भूविज्ञान संस्था असलेल्य नागपूरच्या सेमीनरी हिल्स स्थित भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण- जीएसआयच्या 175 व्या स्थापना दिवसाप्रसंगी 4 मार्च रोजी जीएसआय नागपूर ( मध्य क्षेत्र ) विभागप्रमुख आणि अतिरिक्त महासंचालक दिनेश व्ही. गणवीर, यांनी सांगितले की जीएसआयचा सुरुवातीचा केंद्रबिंदू हा महत्त्वाचे बल्क मिनरल शोधणे हा होता परंतु आता जीएसआयने क्रिटिकल मिनरल च्या शोधाकरिता आपले लक्ष केंद्रित केले आहे. जीएसआय आणि मिनरल एक्स्प्लोरेशन कार्पोरेशन लिमिटेड हे संयुक्तरीत्या क्रिटिकल मिनरल ब्लॉकच्या उत्खननामध्ये तसेच शोधामध्ये कार्यरत असून क्रिटिकल मिनरल्स वर इतर देशावर असणार खनिज अवलंबित्व कमी करण्याच्या हेतूने आणि हरित ऊर्जेला चालना देण्याच्या हेतूने हे दोन्ही विभाग कार्य करत असल्याचे सांगितले . याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत एस. बोकारे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . याप्रसंगी बोकारे यांनी सांगितले की , गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचा कुलगुरू म्हणून आपण स्वतः हे अनुभवले आहे की खनिज किंवा खान क्षेत्र आदिवासी क्षेत्रात आल्यामुळे येथील आदिवासींच्याआर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडले असून त्यांच जीवनमान सुधारलेला आहे .
दरम्यान या स्थापना दिवसानिमित्त आटोमिक मिनरल डिरेक्टरेट, जवाहरलाल नेहरू ॲल्युमिनियम संशोधन संस्था तसेच जीएसआयच्या संस्थांचे संशोधन दाखवणारे दालने या ठिकाणी लावण्यात आली होती. .1851 मध्ये स्थापना झाल्यापासून, जीएसआय खनिज अन्वेषणामध्ये अग्रेसर असून भारताच्या आर्थिक प्रगतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
या कार्यक्रमाला जीएसआयच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचा तसेच इतर खनिज संशोधन संस्थातील निवृत्त कर्मचारी यांचा सत्कार देखील करण्यात आला .या कार्यक्रमाचे संचालन जीएसआयच्या धोरण आणि नियोजन विभागाच्या संचालक शिप्रा मेश्राम यांनी केले .
