एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

महापॉवरपे वॅलेटसाठी महावितरणला पुरस्कार ग्रामीण भागातील डिजिटल बिल भरणा सुविधा

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

नागपूर, दि. 5 मार्च 2025: छोट्या व्यावसायिकांच्या माध्यमातून वीज ग्राहकांनी ऑनलाईन बिल भरणा करण्यासाठी विकसित केलेल्या महापॉवरपे वॅलेट या सुविधेसाठी महावितरणला डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अचिव्हमेंट पुरस्कार मंगळवारी मुंबईत देण्यात आला. या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणने ग्राहकांच्या सेवेसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला आहे. महापॉवरपे वॅलेटचा वापर करून ग्रामीण भागातील दुकानदार अथवा बचत गट बिल भरणा केंद्राची सेवा वीज ग्राहकांना देऊ शकतात. त्यातून त्यांना कमिशनच्या स्वरुपात उत्पन्नही मिळते. राज्यात प्रामुख्याने ग्रामीण व निमशहरी भागात ४,८७८ महापॉवरपे केंद्रे आहेत. त्याद्वारे दरमहा १३ लाखापेक्षा अधिक ग्राहक वीजबिल भरणा करतात व दरमहा सरासरी १४७ कोटी रुपयांचा भरणा होतो.

महावितरणच्या कार्यकारी संचालक (वित्त) स्वाती व्यवहारे, सहायक महाव्यवस्थापक (वित्त) श्वेता जानोरकर, उप महाव्यवस्थापक सायली जव्हेरी आणि प्रणाली विश्लेषक (माहिती तंत्रज्ञान) स्नेहल चव्हाण यांनी पेमेंट सिक्युरिटी समिट अँड ॲवॉर्ड्स इंडिया २०२५ या पुरस्कार सोहळ्यात महावितरणतर्फे हा पुरस्कार स्वीकारला.

महापॉवरपे वॅलेट ही सुविधा वापरून गावातील किराणा दुकानदार, मेडिकल दुकानदार, दैनंदिन गरजेच्या वस्तू विकणारे दुकानदार असे व्यावसायिक वीज ग्राहकांना डिजिटल पेमेंटची सुविधा देऊ शकतात. बचत गटही अशी सुविधा वीज ग्राहकांना उपलब्ध करू शकतात. यामुळे वीज ग्राहकांना आपल्या सोईनुसार जवळच्या महापॉवरपे सुविधा असलेल्या दुकानातून वीजबिल भरता येते. ही अत्यंत सोपी पण सुरक्षित बिलभरणा सुविधा आहे.

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,

महावितरण, नागपूर

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link