एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

राष्ट्रीय लाईनमन दिनानिमित्त जनमित्रांचा गौरव नेत्रदान शिबिर, कार्यशाळा आणि मेळाव्यांचे आयोजन

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

सतिश कडु : नागपूर, दि. 5 मार्च 2025: महावितरणच्या नागपूर परिमंडलात राष्ट्रीय लाईनमन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने नेत्रदान शिबिर, लाईनमन मेळावे, सुरक्षा कार्यशाळा यासारखे विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत विविध विभागातून अनेक उपक्रमांच्या माध्यमातून परिमंडलातील जनमित्रांचा गौरव करण्यात आला.

जनसामान्यांना लाईनमन म्हणून परिचित असलेला महावितरणचा जनमित्र हा महावितरणच्या वीज वितरण व्यवस्थेचा आत्मा आहे. ऊन, वारा, पाऊस याची कसलीही तमा न बाळगता, खडतर परिस्थितीतही महावितरणचा जनमित्र ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्याचे कार्य अहोरात्र करीत असतो. त्यांची एक चूक त्यांना मरणाच्या वाटेवर घेऊन जाणारी असते, चुकीला माफी नसलेल्या अशा ग्राहक सेवेत २४ तास ऑन ड्युटी असलेल्या लाईनमनच्या कार्याची उचित दखल घेत त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान करण्यासाठी लाईनमन दिनाचे आयोजन देशपातळीवर करण्यात येते.

लाईनमन दिनाचे औचित्य साधून महावितरणच्या सिव्हिल लाईन्स विभागातर्फे जनमित्र मेळाव्याचे आयोजन मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मुख्य अभियंता यांनी ग्राहकांना अपघातमुक्त वीज पुरवठा करण्यासाठी सुरक्षा साधनांचा वापर करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. यावेळी अधीक्षक अभियंता अमित परांजपे, कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे आणि विभागातील सर्व अभियंते आणि जनमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जनमित्रांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

रौशनी फाउंडेशन, माधव नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने गांधीबाग विभागातर्फे नेत्रदान जागरूकता आणि डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल 104 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी 11 कर्मचाऱ्यांनी नेत्रदान करण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी अभियंता राहुल जीवतोडे होते. तर नंदनवन उपविभागातर्फे प्रसिद्ध समाजसेवक ज्ञानेश्वर रक्षक यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि आपल्या अनेक संतांनी दिलेल्या मानवी मूल्यांबाबत प्रबोधन करताना जनमित्रांना सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. तर कुही उपविभागातर्फे आंतरशाखा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याचसोबत वर्धा विभागातर्फे कॅरम आणि टर्फ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा विद्युत निरीक्षक यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना काम करताना सुरक्षा बाळगण्याचे आवाहन आपल्या मार्गदर्शनातून केले. यावेळी अधीक्षक अभियंता स्मिता पारखी, कार्यकारी अभियंता स्वप्निल गोतमारे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय लाईनमन दिनानिमित्त काटोल, उमरेड, बुटीबोरी, आर्वी विभागासोबतच त्रिमुर्तीनगर, शंकरनगर, हुडकेश्वर, भिवापूर, हिंगणा, उमरेड, कोंढाळी, आर्वी शहर आष्टी उपविभाग व इतरही कार्यालयांतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनमित्रांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

फोटो ओळ.

1. राष्ट्रीय लाईनमन दिनानिमित्त सिव्हिल लाईन्स विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते जनमित्रांचा गौरव करण्यात आला.

2. काटोल विभागात आयोजित लाईनमन दिवस कार्यक्रमात कार्यकारी अभियंता दीपक आघाव यांच्या हस्ते जनमित्रांचा सन्मान करण्यात आला.

3. वर्धा विभागात जनमित्रांना सुरक्षेबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, नागपूर

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,

महावितरण, नागपूर

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link