अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात.
गणेश तारू : चैतन्य भाषा प्रसार मंडळ यांच्या विद्यमाने, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सपकळवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे.येथे मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून लहान विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये मराठी भाषेप्रती गोडी निर्माण व्हावी. म्हणून मंडळाचे अध्यक्ष सौ अनिता जोशी यांच्या मार्गदर्शनातून बडबड गीत, चावडी वाचन, तसेच हस्ताक्षर इत्यादी स्पर्धेचे आयोजन केले गेले. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणाप्रसंगी संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या साखरबाई ढोले उपस्थित राहिल्या. विद्यार्थ्यांना शालेउपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेच्या शिक्षिका सौ सर्जे मॅडम, अंगणवाडी शिक्षिका सुधाबाई, तसेच सेविका रेखा वाघमारे बाई यांचे विशेष सहकार्य लाभले.
