अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात.
गोपाळ भालेराव : इंडियन पोलीस मित्र संघटनेच्या वतीने गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातील रेस्ट हाऊस येथे पदाधिकारी आणि सभासदांची बैठक जिल्हा पोलीस उपअधीक्षक सदानंद सदांशिव यांचे अध्यक्षतेखाली तर डॉ.सुरेश राठोड यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली. पोलीस मित्रांनी जनहितार्थ सेवा कशी करावी, सामाजिक दायित्व जोपासावे , महिला अन्याय आणि अत्याचार विरोधात लढा दिला पाहिजे. संघटनेच्या वतीने पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याबाबत सदानंद सदांशिव यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या बैठकीला इंडियन पोलीस मित्र संघटनेचे प्रमुख डॉ सुरेश राठोड, जिल्हा कार्याध्यक्ष चक्रधर मेश्राम, महिला जिल्हाध्यक्ष प्रमीला रामटेके , सविता चव्हाण , इंद्रपाल गेडाम , शहराध्यक्ष सौरभ कुंभारे, विनोद मडावी, जिल्हाध्यक्ष हंसराज उराडे आदींसह बहुसंख्य पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते. आयोजित बैठकीत पोलिस उप अधिक्षक सदानंद सदांशिव यांचे हस्ते उपस्थित सभासदांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले., इंडियन पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून गडचिरोली येथे अनेक रोजगारभिमुख, व्यावसायीक, दृष्टीकोनातून विविध विषयांवर प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन कार्याध्यक्ष चक्रधर मेश्राम प्रास्ताविक भाषणात यांनी सांगितले. पोलीस मित्रांची जबाबदारी आणि सामाजिक दायित्व, कर्तव्य पार पाडत असताना निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मत डॉ सुरेश राठोड यांनी व्यक्त केले. बैठकिच्या यशस्वितेसाठी सर्व इंडियन पोलीस मित्रांनी मोलाचे सहकार्य केले.
