अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे जिल्हा सह संपादक गोपाळ भालेराव
दिनांक 22/ 02//025 रोजी श्रीमती नलिनी ओंकार गायकवाड वय 65 वर्षे राहणार जांबे तालुका मुळशी, जिल्हा पुणे या माळवाडी तालुका खेड जिल्हा पुणे येथे त्यांच्या नातेवाईकांकडे भेटण्यासाठी आल्या असता त्या तळेगाव ते चाकण कडे जाणाऱ्या रस्त्याने पायी चालत असताना त्यांच्याकडे दोन व्यक्तींनी पत्ता विचारण्याच्या पाहण्याने बोलण्यात गुंतवून व दरम्यानच्या कालावधीत त्यांची फसवणूक करून त्यांच्या गळ्यातील 90 हजार रुपये किमतीचे सोन्याचे डोरले घेऊन निघून गेले होते. सदर या घटनेनंतर श्रीमती नलिनी ओमकार गायकवाड यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली होती. दाखल गुन्ह्याचा तपास डी बी पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अनंत रावण करीत होते .सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये अशाच प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी आळेफाटा येथे मिळून आल्याची माहिती मिळाल्याने अधिकचा तपास करून गुन्ह्याचे कामी आरोपी 1) सुरज हसमुखभाई राजपूत,2) राहुल हसमुखभाई राजपूत 3)हरी गंगाराम बावरी राठोड व 4) बबलू बिरचंद सोलंकी सर्व राहणार गुजरात राज्य यांना अटक करण्यात आली असून त्यांनी फसवणूक करून घेऊन गेलेले सोन्याचे डोरले हस्तगत करण्यात आले आहे.चार ही आरोपींवर तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन भाग 5 गुन्हा रजिस्टर नंबर 52/ 2025 भारतीय न्याय संहिता कलम 318 (4) ,3 ( 5 )नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विवेक गोवारकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनंत रावण, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश जाधव, पोलीस नाईक ज्ञानेश्वर सातकर, पोलीस कॉन्स्टेबल भीमराव खिलारे ,पोलीस कॉन्स्टेबल विनायक शेरमाळे, पोलीस कॉन्स्टेबल स्वराज साठे ,पोलीस कॉन्स्टेबल रमेश घुले, पोलीस कॉन्स्टेबल रोशन पगारे यांनी उघडकीस आणला आहे.सदरचा गुन्हा उघडकीस आणण्या करता करिता पोलीस आयुक्त श्री विजयकुमार चौबे ,पोलीस आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर ,अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी ,पोलीस उपआयुक्त श्री विशाल गायकवाड ,सहाय्यक पोलीस आयुक्त श्री बाळासाहेब कोपनर ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजीत जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. गुन्हाचा पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन करत आहे.
