अजिंक्य महाराष्ट्र न्यूज विकास सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज गोपाळ भालेराव
अनाठायी खर्च टाळून पत्रकार भाऊसाहेब महाडिक यांनी वाढदिवसानिमित्त शिंदवणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य वाटप व श्री विठ्ठल बन येथील श्री विठ्ठल अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेच्या अनाथ मुलांना अन्नदान करून वाढदिवस साजरा करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे .
भाऊसाहेब महाडिक हे दैनिक सामनाचे पत्रकार असून लोणी काळभोर येथील हायस्कूल जुनियर कॉलेज क्रीडा प्रमुख म्हणून काम पाहतात . हवेली तालुका माध्यमिक शिक्षण संघाचे व हवेली तालुका क्रीडा शिक्षक संघाने सचिव म्हणून ही काम पाहतात. हवेली तालुक्यातील शिंदवणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना खेळाचे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षक संघाचे राज्याचे अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर, पिंपरी चिंचवड शारीरिक शिक्षण संघटनेचे सचिव राजेंद्र पितळीया ,हवेली तालुका उद्धव ठाकरे शिवसेना विभाग शिवसेनेचे विभाग प्रमुख कुंजीर पाटील ,पत्रकार नितीन करडे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन कुंजीर ,डॉ. मणिभाई देसाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रविद्र भोळे , शिंदवणे तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष नानासाहेब महाडिक ,रयत शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस टि. के. महाडिक श्री छत्रपती संभाजी महाराज
कुस्ती सकुल चे संस्थापक अध्यक्ष शरद महाडिक व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
दौंड तालुक्यातील प्रति पंढरपूर समाजाला जाणाऱ्या डाळिंब गावातील डाळिंब बंन येथील श्री विठ्ठल अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेतील अनाथांना मुलांना अन्नदान करून मुलांच्या सोबत वाढदिवस साजरा करण्यात आला . यावेळी राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. ह .भ .प .सचिन माथेफोड ,पत्रकार सुनील तुपे ,श्री विठ्ठल देवस्थानचे सचिव एल बी कुंजीर ,डाळिंब ग्रामपंचायत उपसरपंच व दौंड तालुका शिवसेना उपप्रमुख सर्जेराव म्हस्के ,श्री विठ्ठल अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश लेकूळे महाराज महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेते ह .भ. प. काशिनाथ दिवेकर, इतिहास संशोधक खालील भाई शेख पत्रकार सहदेव खंडाळे ,पत्रकार अमोल भोसले व इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
