आयएएस अधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी साखर आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला
सौ. कलावती गवळी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी.
राज्यांच्या साखर आयुक्त पदाचा अखेर सिद्धाराम सालीमठ यांनी (दि. ३) सोमवारी सायंकाळी पदभार स्वीकारला आहे.अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी राहिलेले सिद्धाराम सालीमठ यांनी साखर आयुक्त पदाचा स्थापनापत्र आदेश (दि.१८ ) फेब्रुवारी रोजी शासनाने जारी केला होता, दरम्यान डॉ.कुणाल खेमनार यांच्या अचानक बदलीनंतर अतिरिक्त आयुक्त म्हणून दीपक तावरे यांच्याकडे पदभार होता, अखेर सिद्धाराम सालीमठ यांनी सोमवारी सायंकाळी साखर आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे, यावेळी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले, सिद्धराम सालीमठ मूळचे सोलापूरचे असले, तरी त्यांचे शिक्षण हे राहुरीच्या कृषी विद्यापीठात झाले आहे. त्यामुळे त्यांचे नगरशी जुने नाते होते, त्यांचा जिल्हाधिकारी पदाचा कार्यकाळात विविध योजनांमध्ये त्यांनी नगर जिल्हा हा पहिल्या क्रमांकावर नेला होता. प्रशासन गतिमान व पारदर्शक करण्यासाठी त्यांनी नव्या तंत्रज्ञानावर चांगलाच भर दिला होता. शासकीय यंत्रणेला जनतेच्या दारात नेण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात यशस्वी झाला. त्यामुळे आता नगरकरांना नवा जिल्हाधिकारी कोण ? यांचीही उत्सुकता लागली आहे. महायुती सरकार नगरला खमक्या अधिकारी देणार हे मात्र निश्चित आहे. यवतमाळ जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. पंकज आशिया नगरचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांचे नाव फिल्डवर दिसून येत आहे
