अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी शंकर जोग
पुणेकरांसोबत मिळून मिसळून मराठी भाषा शिका
पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
होली मिलन समारोह रंगोली फागण आयो रे या कार्यक्रमांमध्ये बोलत होते,
शिवराणा फाउंडेशन च्या वतीने होली मिलन समारोह आणि राजस्थानी लोकगीते व नृत्यचा आकर्षण कार्यक्रम स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंग मंच मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले, या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले,
यावेळी जितेंद्र डुडी म्हणाले राजस्थानी फार भावुक होतात राजस्थानमध्ये हिंदी बोलतात पण महाराष्ट्रातील राजस्थानी समाज मराठी भाषा शिकले पाहिजे कारण इथल्या माणसांबरोबर मिळून मिसळून भेटून मराठी भाषा शिकले पाहिजे, राजस्थानी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन या पुढे अशा प्रकारे चालू राहिले पाहिजे असे यावेळी सांगितले, याप्रसंगी राजस्थानी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा शाल पुष्पगुच्छ राजस्थानी फेटा आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला,
यावेळी प्रमुख पाहुणे सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय चोरडिया, भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, विधान परिषद सदस्य योगेश टिळेकर, अतिरिक्त आयुक्त (प्रशासकीय) अरविंद चावरिया, राजस्थानी समाजाचे अध्यक्ष मगराज राठी, सामाजिक कार्यकर्त्या नीना ओसवाल, आदि यावेळी उपस्थित होते,
कार्यक्रमाचे आयोजन शिवराणा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सुखदेवसिंह चारण, बिश्नोई ट्रॅव्हल्सचे नारायण डारा, यांनी केले होते
यावेळी राजस्थानी समाजातील होली मिलन समारोह रंगोली फागण आयो रे या कार्यक्रमांमध्ये राजस्थानी कलाकार संगीताच्या कार्यक्रमांमध्ये नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली हा कार्यक्रम बघण्यासाठी पुणे शहरातून राजस्थान समाज बांधव आपल्या परिवारासोबत मोठ्या संख्येने उपस्थित होते
