अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
जेजीपीएल’मध्ये नानाश्री फाऊंडेशनचा संघ ठरला ‘बाजीगर’
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
जळगाव : ग्रामीण परिसरात क्रिकेटला चालना मिळावी म्हणून नुकतीच जळगाव ग्रामीण प्रीमिअर लीग संपन्न झाली. शहरातील मनराज पार्क येथे रंगलेल्या या लीगमध्ये त्रिमूर्ती फाऊंडेशनच्या संघाने पहिल्याच वर्षाच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. मात्र या पहिल्याच वर्षात नानाश्री फाऊंडेशन या संघाने आपल्या दिमाखदार कामगिरीने प्रेक्षकांची मने जिंकत ही स्पर्धा गाजवली.
जळगाव ग्रामीण स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्यामार्फत २७ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान मानराज पार्क येथे जळगाव ग्रामीण प्रिमियर लीग संपन्न झाली. या स्पर्धेत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील हे मुख्य प्रायोजक होते. या स्पर्धेत तब्बल २४ संघांचा सहभाग होता. दरम्यान सदर स्पर्धेवर त्रिमूर्ती फाऊंडेशनच्या संघाने विजेतेपद मिळवत नाव कोरले असून या स्पर्धेत नानाश्री फाऊंडेशनच्या संघानेही दिमाखदार कामगिरी करत क्रिकेटप्रेमींची मने जिंकली.
जिल्हा मार्केटींग फेडरेशनचे संचालक शांताराम सोनवणे तथा युवासेनेचे स्वप्निल सोनवणे यांच्या मालकीच्या नानाश्री फाऊंडेशन संघाने किरण पाटील यांच्या नेतृत्वात सांघिक कामगिरी केली. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात संघाने प्रविण पाटील यांच्या संघावर ९ बळींनी मात करत स्पर्धेचा धडाक्यात शुभारंभ केला. दुसऱ्या सामन्यात संघाने छत्रपती फाऊंडेशनच्या संघावर १२ धावांनी विजय मिळवत उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. तर लीगच्या अखेरच्या सामन्यात मात्र नानाश्री फाऊंडेशनला श्रेया कन्स्ट्रक्शनने ६ बळींनी मात दिली. उप उपांत्यपूर्व सामन्यात नानाश्री फाऊंडेशनने धारदार गोलंदाजीच्या आधारावर शिरसोली वॉरियर्स संघाला ९ बळींनी चित करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला.
मात्र उपांत्यपूर्व फेरीत त्रिमुर्ती फाऊंडेशनने रोमांचक झालेल्या सामन्यात नानाश्री फाऊंडेशनवर अवघ्या ६ धावांनी विजय मिळवला व नानाश्री फाऊंडेशनचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले. या सामन्यात अखेरच्या षटकात नानाश्री फाऊंडेशनला विजयासाठी ३७ धावांची आवश्यकता असतानाच योगशे पाटील यांनी वादळी खेळी करत अखेरच्या षटकाच्या पाच चेंडूंवर सलग पाच षटकार लगावत सामना रोमांचक बनवला. मात्र अखेरच्या चेंडूवर त्यांना पराभव पत्करावा लागला.
स्पर्धेत नानाश्री फाऊंडेशनचे मयुर सपकाळे ( १३५ धावा व ६ बळी ) यांनी अष्टपैलू कामगिरी केली तर चेतन पवार ( ९१ धावा ), कल्पेश सोनवणे ( ७ बळी ), गजानन सपकाळे ( ६ बळी ) आदींनीही आपल्या दर्जेदार खेळाने ही स्पर्धा गाजवली. नानाश्री फाऊंडेशनचा संघ उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला असला तरी आपल्या वादळी फलंदाजीने सदर संघ संपूर्ण स्पर्धेत चर्चेत राहिला. यामुळेच की काय नानाश्री फाऊंडेशन या स्पर्धेत पराभूत होऊनही खऱ्या अर्थाने ‘बाजीगर’ ठरला आहे.
स्वप्नील सोनवणे (युवासेना जळगाव तालुका)
