एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील विस्तारित प्लॅटफॉर्म १२/१३ ची पाहणी केली

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील विस्तारित प्लॅटफॉर्म १२/१३ ची पाहणी केली

प्रतिनिधी सतीश कडू

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री धर्म वीर मीना यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे नुकत्याच पूर्ण झालेल्या नॉन-इंटरलॉकिंग (एनआय) कामांची आणि प्लॅटफॉर्म १२ आणि १३ च्या विस्ताराची पाहणी केली. या प्लॅटफॉर्मचा विस्तार हा २४ कोच गाड्या सामावून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण सुधारणा असणार आहे, यामुळे प्रवाशांची सोय आणि कार्यक्षमता वाढेल. प्लॅटफॉर्म ३०५ मीटरने वाढवण्यात आला असून एकूण लांबी ६९० मीटर झाली आहे.

मध्य रेल्वेने दि. २८ फेब्रुवारी/दि. १ मार्च २०२५ च्या मध्यरात्री ते दि. २/दि. ३ मार्च २०२५ पर्यंत प्री आणि पोस्ट नॉन-इंटरलॉकिंग (एनआय) कामांसाठी विशेष ब्लॉक परिचालीत केले होते. या कमिशनिंगमध्ये विद्यमान सीमेन्स-निर्मित इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टममध्ये बदल करण्यात आले आणि ते फक्त दि. १ मार्च २०२५ रोजी रात्री २३:१५ ते दि. २ मार्च २०२५ रोजी रात्री ९:१५ पर्यंत म्हणजे १० तासांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाले.

*विस्तार आणि सुधारणा कामातील ठळक मुद्दे:*
*पायाभूत सुविधांमध्ये वाढ:* चांगल्या देखभालीसाठी आणि जास्त वेळेसाठी नूतनीकरण करण्यात आले आणि वॉशिंग एप्रन जोडण्यात आले.

*ट्रॅक आणि सिग्नलमध्ये बदल:*
*टर्नाउट:* २ काढून टाकण्यात आले असून १ नवीन समाविष्ट करण्यात आला.
*सिग्नल:* ३ सिग्नल बदलले, २ शंटिंग सिग्नल मुख्य सिग्नलमध्ये रूपांतरित केले आणि १ नवीन शंटिंग सिग्नल जोडण्यात आला.
*कार्यक्षमता:* मार्गांची संख्या २७८ वरून २८५ पर्यंत वाढली.
*सुरक्षिततेचे उपाय:* वाढीव सुरक्षिततेसाठी ड्युअल डिटेक्शन ट्रॅक सर्किट्स बसवण्यात आले.

मध्य रेल्वे या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांमध्ये वेळेवर सुधारणा पूर्ण होणे प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि अधिक कार्यक्षम प्रवास अनुभव प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे.
——–
दिनांक: ०३ मार्च २०२५
प्रप क्रमांक: २०२५/०३/०२
सदर प्रसिद्धी पत्रक जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई यांनी जारी केले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link