अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
अर्थसंकल्पीय अधिवेशनास सोमवारी सुरुवात होत असून अधिवेशना च्या २० दिवसाठी हजारो कोटीचा खर्च
मुंबई -(*सखाराम कुलकर्णी*) महाराष्ट्रशासनाचे दि. ३ मार्च सोमवार रोजी सुरु होत असलेल्या अधिवेशनासाठी मंत्र्यांच्या कॅबीनवर व विधान भवनावर डागडुगी तसेच नवीन फर्नीचर वर – हजारो कोटीचा खर्च करण्यात येत आहे. व हे अधिवेशन जेमतेम 20 दिवसाचे असून त्यात दहा ते बारा दिवस कामकाज स्थगितीमध्येच जातात .जनतेचा हा होणारा हजारो कोटीचा खर्च वीस दिवसाच्या शान शौकीन साठीच होत आहे.व जनतेला वाऱ्यावर सोडले जात ही शोकांतीका आपल्या राज्याची आहे.
महाराष्ट्र शासनाचे वर्षातून तीन अधिवेशन होत असतात. पावसाळी व अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत . तर हिवाळी अधिवेशन नागपूरला होत असतात . या तिन अधिवेशनात फक्त अर्थ संकल्पीय अधिवेशन दिर्घ दिवस म्हणजे२० ते २५ दिवस असते. नागपूर चे अधिवेशन तर ८-१० दिवसात गुंडाळले जाते .मात्र या तिन्ही अधिवेशनावर जनतेला पिळून, शेतकऱ्यांना पिळून- पिळून व्यापाऱ्यांना पिळून शासनाने कमावलेला हजारो कोटीची कमाई या अधिवेशनावर शासनाकडून खर्च केली जाते. असेच प्रत्यक्ष दर्शनी बघितले तर दिसून येते. उद्या दि. तीन मार्चला सुरू होणाऱ्या अधिवेशनासाठी मंत्र्यांच्या कॅबिनसाठी तसेच कॅबिनमध्ये खुर्च्या, झुंबर ,टेबल फॅन, एसी रंगरंगोटी इतकेच काय कॅबिनचे दरवाजे बदलण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या अधिवेशनानंतर चारच महिन्याने पावसाळी अधिवेशन येथेच मुंबईत असते .पण त्यावेळेसही तितकाच हजारो कोटीचा खर्च करून पुन्हा मंत्र्यांच्या ह्याच कॅबिनवर याच प्रकारे खर्च करण्यात येतो. त्यात डागडूगीवर नवीन फर्निचर वर, नवीन पंखे नवीन लॅपटॉप वर हा होत असलेला खर्च होताना हे लक्षात येते की विधान भवन अधिवेशनाच्या अगोदर पडीत ,पडके होते की काय? मागील वेळेस घेतलेले फर्निचर व इतर साहित्य कोणी चोरी करून नेले की काय?की भंगारात विक्री केले.हा प्रश्न पडतो. कारण प्रत्येक वेळेस विधानभवनाची तीच डागडूगी, फर्निचर आदी साहीत्य खरेदी करण्यात येते. असा प्रकारे अधिवेशनावर असा वारे माप हजारो कोटीचा खर्च करण्यापेक्षा हा पैसा शेतकऱ्यांना एखाद्या अनुदानात दिला तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम नक्कीच होईल. कारण इतका वारे माप हजारो कोटीचा खर्च अधिवेशनावर खर्च होऊन पदरात काय पडते तर शून्य. अधिवेशनामध्ये सुरुवातीचे एक दीड तास पायऱ्यावर फोटो निघेपर्यंत विरोधी पक्षांच्या घोषणाबाजी चालतात ,सभागृहात गेल्यावर एखादा प्रश्न उकरून काढून सभेत गोंधळ करून सभा त्याग केला जातो व सभापती हीच संधी साधून आजच्या दिवसाचे कामकाज स्थगित म्हणून घोषणा करतात. त्यामुळे जनतेला असं वाटत आहे की अधिवेशन नको रे बाबा.
