अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात.
सतिश कडु : भारतीय खाण विभाग ७८ वा स्थापना दिवस ‘खनिज दिवस’ म्हणून साजरा.
नागपूर 1 मार्च 2025 भारताची खनिज संपदा अधिक समृद्ध आणि तिला वाढविण्यात भारतीय खाण विभाग आणि जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची महत्वाची भूमिका असून भारताची खनिज ऊर्जेची गरज ही इतर देशांवर अवलंबून न राहता भारत यामध्ये स्वतः स्वयंपूर्ण होईल असे प्रतिपादन जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, (मध्यविभाग) नागपूरचे अतिरिक्त महासंचालक आणि विभाग प्रमुख डी. व्ही.गणवीर यांनी केले.केंद्रीय खाण मंत्रालयांतर्गत भारतीय खाण विभागातर्फे (इंडियन ब्युरो ऑफ माइन्स- आयबीएम) 1 मार्च रोजी आपल्या स्थापना दिनानिमित्त 78 वा खनिज दिन , इंडियन ब्युरो ऑफ माईन्स, सिविल लाईन्स नागपूर येथील मुख्यालयात आयोजित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मिनरल एक्स्पोलेरेशन कार्पोरेशन लिमिटेड- एम इ सी एल नागपूरचे संचालक डॉ. इंद्रदेव नारायण ,भारतीय खाण विभागाचे मुख्य नियंत्रक पंकज कुलश्रेष्ठ प्रामुख्याने उपस्थित होते.
भारतीय खाण विभाग दुर्मिळ खनिज शोधण्यापासून ते खाणींचे व्यवस्थापन हा करत असून या विभागामार्फत मायानिंग टेनेमेंट सिस्टम, मायनिंग सर्वेलन्स सिस्टीम सारखी डिजिटल सुधारणा राबविणारी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. नागपुरात मिनरल ओर इंडिया लिमिटेड-मॉइल, इंडियन ब्युरो ऑफ माईन्स, आणि जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया सारख्या महत्त्वाच्या संस्था असून यांचा त्रिवेणी संगम तयार झाला असल्याची माहिती एम इ सी एल नागपूरचे संचालक डॉ. इंद्रदेव नारायण यांनी यावेळी बोलताना दिली.
भारतीय खाण विभागामार्फत सद्यस्थिती मधे 1,300 खाण आणि खदाणीचे व्यवस्थापन केल्या जात आहे भविष्यात नवीन खनिज उत्खननासाठी एवढ्याच नवीन खाणी निर्माण होतील आणि भारताची दुर्मीळ खनिजासाठीची इतर देशांवर अवलंबून असलेली गरज नक्कीच कमी होईल असा विश्वास भारतीय खाण विभागाचे मुख्य नियंत्रक पंकज कुलश्रेष्ठ यांनी व्यक्त केला.मागील 5 वर्षांपासून विभागाची पुनर्बांधणी उत्तमरित्या झाली असून कुशल मनुष्यबळ आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भारतीय खाण विभाग डिजिटल ट्रान्सफर्मेशन मधे सुद्धा आपला सहभाग नोंदवित आहे. भारत सरकारची एक सल्लागार संस्था म्हणून स्थापन झालेली ही संस्था आज भारताच्या ऊर्जा क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणारी संस्था असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय खाण विभागाचा हा 78 वा स्थापना दिवस हा विभागासाठी एक महत्त्वाचा असा दिवस असून स्थापनेपासून आतापर्यंत विभागाने अनेक सुधारणा केल्या असून येणाऱ्या काळात डिजिटल ट्रान्सफर्मेशन वर विभागाचा भर राहील. शाश्वत खाण व्यवस्थापन सोबतच पर्यावरण संतुलन शाबूत ठेवण्याचे कार्ये केले असल्याची माहिती भारतीय खाण विभाग, नागपूरचे डॉ.अरुणा यांनी यावेळी दिली.
राष्ट्रीय खनिज धोरण परिषदेच्या शिफारशींनुसार भारतीय खाण विभागाची स्थापना 1 मार्च 1948 रोजी करण्यात आली. सुरूवातीला पूर्णपणे सल्लागार संस्था म्हणून लहान प्रमाणात कार्यरत असलेला हा विभाग गेल्या काही वर्षांमध्ये देशाच्या खाण आणि खनिज उद्योगाच्या विविध पैलूंवर काम करणारी एक प्रमुख राष्ट्रीय संस्था म्हणून उदयास आला आहे. वैधानिक तरतुदींची अंमलबजावणी तसेच विविध विकास उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची दुहेरी भूमिका हा विभाग पार पाडत आहे.
भारतीय खान विभागातर्फे खाणींची तपासणी, भूगर्भशास्त्रीय अभ्यास, खाण योजना आणि खाण योजनांची छाननी आणि मंजूरी यांचा समावेश आहे. पर्यावरणीय अभ्यास आणि पर्यावरणाशी संबंधित प्रक्रियेचा अहवाल तयार करून, कमी दर्जाच्या खनिजांच्या उन्नतीसाठी तंत्रज्ञान विकसित करणे आणि त्यांच्या वापरासाठी मार्ग ओळखणे, संभाव्यता प्रकल्प अहवाल तयार करणे आणि संभाव्यता अहवाल तयार करणे याद्वारे खनिज संसाधनांच्या संवर्धनाला चालना देण्याचे काम विभाग करते.नकाशे आणि खनिज संसाधनांची राष्ट्रीय खनिज यादी; खनिज उद्योगाला तांत्रिक सल्ला सेवा प्रदान करणे आणि खाणी आणि खनिजांसाठी डेटा बँक म्हणून कार्य करणे आणि तांत्रिक आणि सांख्यिकीय प्रकाशनांची तयारी यांसारखी कार्ये भारतीय खाण विभागामार्फत केली जातात
या कार्यक्रमाला आयबीएम, जीएसआय ,एमएसीएलचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
