अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात.
संपादकीय : दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबई नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आयोजित दिव्यांग सक्षमीकरण राज्यस्तरीय परिषद पार पडली.या वेळी दिव्यांगासाठी राज्यभर कार्य करणारी मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन यांना आमंत्रित केले गेले.
*यावेळी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने तयार करण्यात आलेले व डॉ.अनघा तेंडुलकर पाटील आणि अॅड. प्रमोद ढोकले यांनी लिहिलेल्या ‘जेष्ठांचा पथदर्शक’आणि याच पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती Silver Strength – A Guide to Senior Empowerment या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. डिजिटीकल वर्क्स या संस्थेने ही पुस्तक प्रकाशित केले.
तसेच दिव्यांगांच्या प्रश्नावरती अनेक तज्ञांनी मार्गदर्शन केले व सेंटर नेहमी दिव्यांगांसोबत राहून काम करेल असे परिषदेचे समन्वयक श्री विजय केंकरे सर म्हणाले.या वेळी दिव्यांगांच्या समस्याही उपस्थित संस्थेच्या पदाधिकारी यांच्या वतीने मांडण्यात आल्या.
या वेळी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्षा खा. सुप्रियाताई सुळे.दिव्यांग बाळांवर थेअरपिने उपचार करणारे सेंटरचे ट्रस्टी डॉ श्री समीर दलवाई. दिव्यांगांना रोजगार निर्माण करून देणारी देशातील अग्रगण्य ट्रेन ऑर्गनायजेशनचे श्री रंजन सर. टेंभुर्णी येथील स्वामीविवेकानंद निराधार संस्थेचे श्री भीमराव कोळी सर. मुंबईतील हेन्डीकेप फाऊंडेशनचे श्री नझीम खान तसेच राज्यभरातून आलेले दिव्यांग संस्थेचे पदाधिकारी आणि दिव्यांगगण यांच्याशी मधु तारा प्रमुखांनी संवाद साधला.
या कार्यक्रमाला मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री नितीनजी शिंदे यांना आमंत्रित केले त्या साठी परिषदेचे समन्वयक दीपिकाजी शेरखाने.तसेच श्री विजयजी केंकरे यांचे आभार व्यक्त मधु तारा प्रमुख यांनी मानले.
