अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात.
सौ. कलावती गवळी. सातारा पोलीस राज्यांत लयंभारी, कार्यालयीन सुधारणा मोहिमेत पटकावला दुसरा क्रमांक मुख्यमंत्र्यांकडून पोलीस अधीक्षकांचा गौरव, सौ. कलावती गवळी प्रतिनिधी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. राज्यस्तरीय,विभागस्तरीय व जिल्हास्तरीय प्रशासन हे लोकाभिमुख गतिमान पारदर्शक पद्धतीने चालावे, याकरिता ( दि. 7 जानेवारी ते 6 एप्रिल ) या कालावधीत राज्यांत 100 दिवसाची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत सातारा पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी करीत राज्यांत दुसरा क्रमांक मिळवला आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ना. अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना हा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या अंतरिम प्रगतीच्या मूल्य मापनामध्ये राज्यांतील सर्व पोलीस अधीक्षक कार्यालयाने राज्यांतील द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांना अभिनंदन करीत पत्र देवुन गौरव केला आहे. सातारा जिल्हा पोलीस दलाने केलेल्या गौरवपुर्ण कामगिरीबद्दल अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व सातारा जिल्हा पोलीस दलातील अंमलदार यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे अभिनंदन केले, सातारा जिल्हा पोलीस दलातील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे सातारा जिल्हा पोलीस दलास हे उत्तुंग यश मिळाले आहे. भविष्यात सातारा जिल्हा पोलीस दलाकडून उल्लेखनीय कामगिरीचा आलेख चढता राहील असेही पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले आहे.
