अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात.
(मंठा तालुका शिवसेनेच्या वतीने आयोजित स्पर्धेत शेकडो बैलगाड्यांचा सहभाग)
प्रतिनिधी – नामदेव मंडपे. मंठा तालुका शिवसेनेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त केदारवाकडी ता. मंठा येथे शुक्रवार (ता. 28) रोजी भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ए जे बोराडे यांच्या हस्ते झेंडी दाखवून करण्यात आले. शिवसेना तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेला बैलगाडा प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बाजार समितीचे संचालक प्रल्हादराव बोराडे, माजी उपसभापती किसनराव मोरे, तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे, योगेश अवचार, दिलीपराव कव्हळे, तुळशीराम कोहिरे, गजानन अवचार, राजेभाऊ कव्हळे, संकेत साखरे, बाळासाहेब देशमुख, भगवान गायकवाड, प्रदीप अवचार यांची उपस्थिती होती. या स्पर्धेमध्ये जालना जिल्ह्यासह चिखली, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, परभणी, मराठवाडा व मराठवाडा बाहेरील स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेचे प्रथम बक्षीस सभापती ए.जे.बोराडे यांच्यावतीने 41,111/- , द्वितीय बक्षीस तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे — 31,111/-, तृतीय बक्षीस योगेश पाटील अवचार — 21,111/-, चतुर्थ बक्षीस दिलीपराव कव्हळे — 14,111/- , पंचम बक्षीस राजेभाऊ कव्हळे – 11,111/- सहावे बक्षीस दत्ताराव चव्हाण — 7111/-, सातवे बक्षीस प्रदीप अवचार — 5111/- यांच्यावतीने जाहीर करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पंचकमिटी म्हणून उद्धवराव कव्हळे, श्रीनिवास कव्हळे, महादेव कव्हळे,शिवाजी कव्हळे, रमेश कव्हळे, बंडू बिडवे, राहुल कव्हळे, गुलाब कव्हळे, बाळू कव्हळे, पवन कव्ह ळे, भाबट, बोराडे, आगे, राठोड यांच्यासह अनेकांनी काम पाहिले. भव्य बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी बैलगाडा प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. स्पर्धा यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनी सहकार्य केले.
