अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दहिवडी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला, पोलीस ठाण्याला मिळाला खमक्या अधिकारी
सौ. कलावती गवळी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी
सातारा जिल्हा पोलीस दलात जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सध्या हळुवार पोलीस ठाणेच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्याचा बिगुल नुकताच सुरू झाला असून. यामध्ये दहिवडी आणि म्हसवड पोलीस ठाणेला नवे अधिकारी मिळाले आहेत. दहिवडी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी म्हणून दत्तात्रय दराडे यांनी दहिवडी पोलीस ठाणेचा बुधवारी सकाळी मावळते सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्याकडूंन पदभार स्वीकारला आहे. तर दहिवडी पोलीस ठाणेत कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची म्हसवड पोलीस ठाणेत बदली झाली आहे, तर म्हसवड पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांची कराड तालुका पोलीस ठाणेत बदली झाली आहे. दहिवडी पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी सातारा जिल्हा पोलीस दलात लोणंद औंध जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात तसेच नक्षलग्रस्त म्हणून ओळख असणाऱ्या गडचिरोली जिल्हा पोलीस दलातही उत्कृंष्ट सेवा दिली आहे. त्यांच्या नियुक्तीने दहिवडी पोलीस ठाणेला कर्तव्यदक्ष आणि खमक्या अधिकारी मिळाला आहे. प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या या जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून करण्यात आल्या असून. नव्या अधिकाऱ्यांनी आपल्या पदस्थापने ठिकाणी तात्काळ पदभार स्वीकारला आहे.
