लोकप्रिय सीईओ कीर्ती किरण पुजार यांनी धाराशिव जिल्हाधिकारी म्हणून प्रथमच स्वीकारला पदभार, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्याकडे सोलापूर महानगरपालिकेची जबाबदारी
सौ. कलावती गवळी ( धाराशिव जिल्हा ) प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यातील वादग्रस्त जिल्हाधिकारी डॉ .सचिन ओंबासे यांच्या बदलीनंतर रत्नागिरी येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि रत्नागिरी जिल्ह्यात लोकप्रिय म्हणून गाजलेले सीईओ कीर्ती किरण पुजार यांनी धाराशिव जिल्हाधिकारी म्हणून गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पदभर स्वीकारला आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अप्पर जिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी तसेच प्रांत यांच्यासह अधिकारी कर्मचारी वर्गाकडूंन स्वागत करण्यात आले, नवनियुक्त जिल्हाधिकारी मूळचे कर्नाटकच्या भूमीतील जन्मलेल्या कीर्ती किरण पुजार यांनी महाराष्ट्रांत विविध जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत. त्यांनी आत्तापर्यंत प्रशासकीय प्रवास गोंडपिंपरी ( चंद्रपूर ) येथे उपविभागीय अधिकारी, किनवट (नांदेड) येथे आदिवासी प्रकल्प अधिकारी, आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असा त्यांचा शासकीय प्रवास राहिला आहे. धाराशिव जिल्ह्यात प्रथमच जिल्हाधिकारी पदी विराजमान होत असल्याने ही देखील जबाबदारी त्यांच्यासाठी मोठ्या संधीसह तितकाच मोठा कसोटीचा क्षण ठरणार आहे. कीर्ती किरण पुजार हे 2017 तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी सलग तीन वर्ष उत्कृंष्ट सेवा दिली. अतिशय कमी कालावधीमध्ये त्यांनी उत्तम काम केल्याने अल्पावधीतच लोकप्रिय मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रसिद्ध झाले होते. बांधकाम पाणीपुरवठा आरोग्य शिक्षण आदीं कामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रथम प्रयत्न केले होते. यापूर्वीचे वादग्रस्त जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची सोलापूर महानगरपालिकेत आयुक्त पदावर बदली झाल्यापासून धाराशिव जिल्हाधिकारी पदी कोणाची वर्णीं लागणार याकडे जिल्हावासीयांचे चांगलेच लक्ष लागून होते
