अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी गणेश तळेकर
हिंदू धर्म रक्षक दानशूर भागोजी कीर यांच्या १५६ व्या जयंतीनिमित्त त्यांचा जयंती सोहळा उत्साहात पार पडला
राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांच्या खामगांव, बुलढाणा येथील मुक्तेश्वर आश्रमात मार्गशीर्ष महिन्यात, डिसेंबर १९७१ मध्ये भी आठ दिवस अनुष्ठान केले. निर्गुण पादुका महोत्सव परमपुज्य पाचलेगावकर महाराजांच्या उपस्थितीत संपूर्ण भारतातून आलेल्या हजारो भक्तांच्या सानिध्यात उत्साहात साजरा झाला. दुसऱ्या दिवशी गुरुमंत्र देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परमपुज्य पाचलेगावकर महाराजांचे आठ दिवस आणि सानिध्य मला लाभले होते. परमपुज्य पाचलेगावकर महाराजांना मी श्रीफळ दिले व नमस्कार केला. त्यावेळी त्यांनी मला स्वतः गुरु मंत्र दिला व त्यांनी मला आज्ञा केली की यापुढे तू अनुष्ठान करावयाचे नाही. तुझ्या धडा वरील नारळ मला हवा आहे. तू तानाजी मालुसरे होशील. तो काळ पाकिस्तानच्या बरोबर सुरू असलेल्या लढाईचा होता. त्या क्षणापासून परमपुज्य पाचलेगावकर महाराजांनी सर्व राजकीय पक्षांच्या, पदाधिकाऱ्यांच्या नेतेमंडळींना भेटीगाठी घेण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. मुख्यमंत्री वसंतराव नाईक, मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, सभापती वि. स. पागे. सभापती रा. सु. गवई, मंत्री प्रभाकर कुंटे, विलास सावंत, शिवराज पाटील, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पि के सावंत, उपमुख्यमंत्री उत्तमराव पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नानाजी देशमुख यांच्या प्रत्यक्ष भेटी परमपुज्य पाचलेगावकर यांच्या आदेशाने मी घेतल्या. यातील अनेकांना महाराजांनी राष्ट्रीय कार्यासाठी, धर्मकार्यासाठी शक्ति सामर्थ्य दिले व त्यासाठी नेते मंडळी पुन्हा पुन्हा परमपूज्य पाचलेगावकर महाराजांना भेटण्यासाठी येत असत. असेच शक्ती सामर्थ्य परमपूज्य पाचलेगावकर महाराजांनी दानशूर भागोजी कीर यांनाही दिले. क्रांतिकारकांचे मुकुटमणी स्वा. सावरकर यांच्या प्रेरणेने दानशूर कर्मवीर महामानव भागोजीशेठ कीर यांनी सर्व जातीतील लोकांना खुले असे पत्तित्तपावन मंदिर १९३७ मध्ये निर्माण केले. त्यांच्याकडून रत्नागिरी येथे पतीत पावन मंदिर याचबरोबर दादर, मुंबई येथे हिंदू स्मशानभूमी, अनेक गोशाळा, धर्मशाळा देशभर बांधून घेतल्या. परमपूज्य पाचलेगावकर महाराज यांनीच हिंदू धर्म रक्षक ही पदवी दानशूर भागोजी कीर यांना दिली व त्यांच्याशी शेवटपर्यंत त्यांचे घनिष्ठ संबंध होते. भागोजी कीर यांनी परमपूज्य पाचलेगावकर महाराजांना माहीम येथील भागोजी भुवन येथिल रुम कायमस्वरूपी दान केली होती.
महामानव
भागोजीशेठ कीर
श्री दत्त मंदिर ट्रस्ट
रजि. नं. ३ २१८४१
श्री दत्त मंदिराचा इतिहास
मुंबईत माहिम मधील टी. एच. कटारिया मार्गावरील इ.स. १९३९ ला श्री दत्त मंदिर उभारले. या मंदिराचे बांधकाम प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक श्री. शापूरजी पालनजी यांनी केले. मंदिर उभारल्यावर दत्त महाराजांच्या मुर्तीची स्थापना कुठे करायची त्यासाठी प. पू. पाचलेगावकर महाराजांनी त्यांच्या गळ्यातील नाग मंदिरात सोडला व ज्या स्थानी ते नागदेवता जाऊन विराजमान झाले त्या स्थानी महाराजांच्या मुर्तीची विधिवत स्थापना नागपंचमीच्या दिवशी करण्यात आली. महामानव भागोजीशेठ कीर यांनी हे मंदिर धर्मकार्यासोबत देशकार्याच्या उपयोगी यावे या इच्छेने त्याचे निर्माण केले. मंदिर निर्माणानंतर महामानव भागोजीशेठ कीर कित्तेकदा स्वा.
सावरकर यांना वेगवेगळ्या कार्यक्रमाला घेऊन येत असत. बेळगांवच्या प. पू. गुरुदेवता श्री कलावती माता या स्वयं ह्या मंदिरात प्रवचन व भजन करायच्या व त्यांनी सुरु केलेली प्रथा आजही त्यांचा संप्रदाय या मंदिरात हरीनाम सप्ताह व दर रविवारी बालोपासना मोठ्या उत्सहाने करत आहेत. मंदिरातील दत्त महाराजांची मुर्ती ही दुर्मिळ असून अनेक भक्तगणांच्या मनोकामना येथे पूर्ण झाल्या आहेत.
प्रति वर्षी मंदिरात श्रीदत्तजयंती उत्सव, महाशिवरात्री, व नागपंचमी उत्सवाच्या दिवशी भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करुन मंदिर प्रदक्षिणेची प्रथा आजही केली जात आहे. तसेच श्रीरामनवमी, हनुमान जयंती व कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. दर गुरुवारी सायंकाळी मंदिरात करुणात्रिपदी, आरती व भजनाचा कार्यक्रम नियमितपणे केला जातो.
