अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात.
सौ. कलावती गवळी : सोलापुरांत भाच्याचं जुळले मामीवर प्रेम मामीवर होती करडी नजर, मामासह प्रियकर भाच्याचा तलावात मृत्यू : पोलीस घटनास्थळी दाखल, सौ. कलावती गवळी (सोलापूर जिल्हा ) प्रतिनिधी. बार्शी तालुक्यातील महागांव तलावात मामा आणि भाच्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे.घटनेची माहिती मिळताच बार्शी शहर पोलीस आणि पांगरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहे.पण हा घातपात तर नाही ना.? यांची पोलीसांना शंका आली पोलिसांनी त्या दिशेने तपासही सुरू केला. आणि जी धक्कादायक घटना समोर आली त्याने पोलीसही हादरुन गेले, भाच्याचं मामीवर प्रेम होते.दोघांचेही संबंध सुरु होते.पण या प्रेम संबंधाला मामा अडसर ठरत होता.तर मामीला मामाकडुंन सातत्याने मारहाण सुरू होती. त्यामुळेच भाच्याने मामाचा काटा काढण्याचा प्लान रचला होता. प्लाननुसार मामा आणि भाड्याने भरपूर दारू घेतली.दोघेही महागांव तलावाजवळ आले तिथेही दोघेही पुन्हा दारु पिले,पण मामा नशेत तर्रर होता. त्याला चढली होती. त्यामुळे भाच्याने मामाला तलावात ढकलण्याचा प्रयत्न केला.मामा तलावात पडलाही पण पडताना त्याने भाच्यालाही तलावात ओढले तलावाचं पाणी खोल होते.दोघांनाही पोहायला येत नव्हतं त्यामुळे दोघांचाही तलावात बुडून मृत्यू झाला. मात्र या घटनेमुळे सोलापुरात मामा भाच्याची चांगलीच होतंय चर्चा, या प्रकरणी पोलिसांनी मामी रुपाली राठोड हिचीही कुसून चौकशी केली. त्यामुळे तिने सुपर्ण गुन्ह्यांची कबुली देत अख्या प्लान पोलिसांसमोर मांडला त्यामुळे पोलिसांनी तिला अटक केली असून तिला 27 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात सुनावण्यात आली आहे.
