अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात.
सोशल मीडिया लोकप्रिय रील्स स्टार अभिषेक साठे याची आत्महत्या :- प्रेम प्रकरणाची चर्चा, चाहत्यांना मोठा धक्का, संभाजी पुरीगोसावी (कोल्हापूर जिल्हा) प्रतिनिधी. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी रुईया येथील लोकप्रिय सोशल मीडिया स्टार रील्स अभिषेक साठे यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे घटना (19 फेब्रुवारी) रोजी घडली होती अभिषेक साठे हा सोशल मीडियावर रिल्सद्वारे चांगलाच प्रसिद्ध झाला होता. त्याच्या पोस्ट व्हिडिओ ना देखील चांगलाच प्रतिसाद मिळत होता. कमी वयात त्यांनी आपले नाव चांगलेच गाजवले होते. अभिषेक चे भाग्यश्री या नावाच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मागील काही दिवसांपासून सतत दोघांमध्ये वाद सुरू होते, आणि याच मानसिक तणावातून अभिषेक साठे यांनी टोकाचं पाऊलं उचलले बोलले जात आहे, सोशल मीडिया रिल्स स्टार अभिषेक साठे याच्या अचानक जाण्यामुळे त्याच्या तमाम चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.
