म्हसावद थेपडे विद्यालयात राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे स्वा सै पं ध थेपडे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, म्हसावद येथे आज रोजी थोर समाज सुधारक राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य श्री पी डी चौधरी सर यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती हूजरे मॅडम, सौ श्रुती पाटील मॅडम, श्री एन ए पाटील सर, श्री निलेश पवार सर तसेच वस्तीगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.
