अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी सतीश कडू
जिल्ह्यातील 19 हजार 85 लाभार्थ्यांना मंजूरीपत्राचे झाले वाटपजि
जील्ह्यातील तब्बल 12 हजार 832 लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण
दूरदृष्य प्रणालीद्वारे प्रतिनिधीक लाभार्थी झाले सहभागी
नागपूर, दि. 22 – देशातील कोणताही व्यक्ती आपल्या हक्काच्या घरापासून वंचित राहू नये या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत आज जिल्ह्यातील सूमारे 19 हजार 85 लाभार्थ्यांना मंजूरीपत्र देण्यात आले. याचबरोबर तब्बल 12 हजार 832 लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले.
देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 (2024-25) अंतर्गत राज्याच्या ग्रामीण विकास व पंचायत राज विभागामार्फत पुणे येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या उपस्थितीत आज विशेष समारंभ आयोजित करण्यात आला होता. दूरदृष्य प्रणालीद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांसह नागपूर जिल्ह्यातील लाभार्थी प्रातिनिधीक स्वरुपात सहभागी झाले होते.
येथील जिल्हा परिषदेच्या स्व. आबासाहेब खेडकर सभागृहात दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झालेल्या प्रातिनिधीक स्वरुपात 70 लाभार्थ्यांना घरकुल मंजूरीपत्राचे वितरण करण्यात आले. याचबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायत पातळीवरही दूरदृष्य प्रणालीद्वारे लाभार्थी सहभागी झाले होते.
पुणे येथील मुख्य समारंभात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोड व मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, ग्रामविकास विभागाचे उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका वर्षा गौरकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपूल जाधव व वरिष्ठ अधिकारी यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला.
