अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात.
मालेगाव एरंडगांव येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली शिवव्याख्याते निशा ताई जाधव यांचे व्याख्यान झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष हिंदवी स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष श्री नितीन आबा देवरे तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष श्री रमेश भाऊ देवरे व प्रदेश अध्यक्ष प्रवीण भाऊ अहिरे हे होते
शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव शाळेतील विद्यार्थी यांनी शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत भाषणे केली त्यांना प्रोत्साहन म्हणून संघटनेच्या वतीने वह्या व पेन वाटप करण्यात आले यावेळी एरडगावचे सरपंच अनिल केदारे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष संदिप सोनवणे छत्रपती राजे ग्रुप पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
हिंदवी स्वराज्य संघटना नेहमीच सामाजिक कार्यक्रमात सहभागी होत असते आणि नवीन नवीन उपक्रम आयोजित करत असतात प्रदेश अध्यक्ष प्रवीण भाऊ अहिरे व राष्ट्रीय अध्यक्ष रमेश भाऊ देवरे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.
