अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना महावितरणचे अभिवादन
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
नागपूर, दि. 20 फेब्रुवारी, 2025: – मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरण कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले.
महावितरनच्या काटोल मार्गावरील विद्युत भवन या मुख्यालयात नागपुर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले, यावेळी अंजली देशपांडे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याची विस्तृत माहिती दिली, यावेळी अधीक्षक अभियंते मधुकर घुमे, विधी सल्लागार डॉ. संदीप केने, कार्यकारी अभियंता समीर शेंद्रे व व अजय कोलते, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसुदन मराठे, सहायक मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महेश जाधव, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर यांचेसह अधिकारी व कर्मचा-यांनी देखील आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केले.
फ़ोटो ओळ – आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करतांना महावितरणचे अधिकारी
