अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी सतीश कडू
केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांच्या हस्ते 26व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे चंद्रपूर येथे उद्घाटन.
चंद्रपूर /नागपूर – 20 फेब्रुवारी 2025
आज केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्या हस्ते २६ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव २०२४ चे उद्घाटन करण्यात आले. हा महोत्सव गोंडवाना विद्यापीठाच्या यजमानपदाखाली दिनांक १८ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी २०२५ दरम्यान चंद्रपूर व बल्लारपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच त्यांना राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्याचा सन्मान मिळाला आहे.
या महोत्सवात कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, अॅथलेटिक्स व बुद्धिबळ असे ८ क्रीडा प्रकार समाविष्ट आहेत. या स्पर्धेत आतापर्यंत २२४५ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून अंदाजे ४५०० खेळाडू महोत्सवात सहभागी होतील.
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी या क्रीडा महोत्सवाचे कौतुक करताना सांगितले की, हा उपक्रम सरकारच्या क्रीडा धोरणाला ग्रामीण आणि शहरी पातळीवर प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनाचा एक भाग आहे. तसेच, भविष्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यासाठी केंद्र सरकार अशा क्रीडा उपक्रमांना भक्कम पाठिंबा देण्यास कटिबद्ध आहे,
या महोत्सवात उद्घाटन समारंभानंतर भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा महोत्सव केवळ खेळांसाठीच नव्हे, तर विद्यार्थ्यांना एकत्रित आणून महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीला चालना देण्याचा एक अनोखा उपक्रम ठरणार आहे.
उद्घाटन समारंभात रक्षा खडसे यांनी खेळ क्षेत्राला ‘सनराईज इंडस्ट्री’ म्हणत युवकांसाठी मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच, गोंडवाना विद्यापीठाचे अभिनंदन करत त्यांनी क्रीडेमुळे युवा पिढीमध्ये शिस्त, संघभावना व उत्कृष्टतेचा विकास होतो यावर भर दिला. केंद्र सरकार खेळांना चालना देण्यासाठी आणि नवोदित खेळाडूंना संधी मिळवून देण्यासाठी पूर्णतः कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
केंद्रीय राज्यमंत्री खडसे यांनी या प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धेचे कौतुक करत मूलभूत पातळीवर खेळांना चालना देणे आणि नवोदित खेळाडूंना घडवणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. भविष्यातील विजेते तयार करण्याच्या दृष्टिकोनातून अशा उपक्रमांना केंद्र सरकारचा संपूर्ण पाठिंबा राहील, असेही त्यांनी सांगितले.
चंद्रपूर हे राज्यातील क्रीडा उत्कृष्टतेचे केंद्र होईल आणि क्रीडा सुविधा सुधारण्यासाठी आपण पूर्ण सहकार्य करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या महोत्सवाला या कार्यक्रमाला आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा जी. सी., जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. अविनाश पुंड आणि चंद्रपूरचे माजी उपमहापौर श्री. राहुल पावडे यांची उपस्थिती लाभली. तसेच, खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा अधिक भव्य आणि उत्साही झाला.
