अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
खातगावच्या समर्थ मठातील पादुकांच्या सिद्धतेचे प्रमाणपत्र प.पू. शंकराचार्य यांच्या हस्ते प्रदान
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सखाराम कुलकर्णी
कर्जत -आनंदी नारायण कृपाण्यास संचलित श्री समर्थ रामदास स्वामी मठ खातगाव ता. कर्जत मठातील समर्थांच्या पादुकाचे व पंचायत मूर्तीचे ऐतिहासिक शास्त्रीय परीक्षण कोर हेरिटेज पुणे या संस्थेने करून या पादुका शिवकालीन असल्याचे प्रमाणपत्र करवीर पिठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते मठाचे कार्यकारी विश्वस्त स. भ. मोहन बुवा रामदासी यांना दिले.
कर्जत तालुक्यातील खातगाव येथील श्री समर्थ रामदास स्वामी मठात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दासनवमी उत्सहास सुरुवात झाली. मठ स्थापनेला तपपूर्ती झाली त्यानिमित्य करवीर पिठाचे शंकराचार्य यांची उपस्थिती लाभली. शंकराचार्य यांच्या हस्ते दि.२० फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रम संपन्न झाले. सकाळी सात वाजता पाद्य पूजा होऊन ऐतिहासिक वस्तूंच्या परीक्षण व परिरक्षण करणाऱ्या पुणे येथील कोर हेरिटेज या संस्थेने समर्थांच्या मठातील समर्थांच्या पादुकांचे ऐतिहासिक परीक्षण केले. या संस्थेचे संशोधक व संचालक राकेश धावडे सर पाटील यांनी या पादुका किमान ३०० ते ३५० वर्ष जुन्या व शिवकालीन असल्याचे सिद्ध केले. याबाबतचे प्रमाणपत्र करवीर पिठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते व कोर हेरिटेज संस्थेचे संचालक राकेश धावडे सर पाटील यांच्या उपस्थितीत श्री समर्थ मठाचे विश्वस्त समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी यांना दिले. यानंतर श्री समर्थांच्या मठात असलेल्या गोशाळेतील शेण व गोमूत्र या पासून काही वस्तू उत्पादनाचे उद्घाटन शंकराचार्य यांनी केले. त्याचबरोबर मठात असलेल्या मारुतीच्या मूर्ती समोर रामाचे मंदिर बांधण्याचा निर्णय मठाच्या कार्यकारिणीने घेतला त्या मंदिराचे भूमिपूजन शंकराचार्य यांच्या हस्ते झाले. यावेळी करवीर पिठाचे शंकराचार्य यांनी आशीर्वचन देताना म्हणाले, प्रत्येकाने सकारात्मक विचार मनात ठेवावा त्यास नक्की यश येतेच. कलियुगात धर्म टिकून राहिला व धर्मच आम्हाला तारणार असे सांगून नामस्मरण शब्द कसा चुकीचा आहे,गीतेतील काही अध्यायाचे दृष्टांतावर प्रबोधन केले. व जी गोष्ट श्रद्धेने केली त्यास फळ मिळते. तसेच मोहनबुवा रामदासी यांनी पादुकांचे परीक्षण करण्याचा जो उपक्रम राबवला त्याची प्रशंसा शंकराचार्य यांनी केली. यानंतर स. भ. मोहन बुवा रामदासी यांनी आपले विचार व्यक्त करताना मंदिरातील बांधकामाची माहिती देताना म्हणाले शासनाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेच्या अंतर्गत विविध विकासकामे करणे या क्षेत्रातून दिलेल्या निधीतून भक्त निवासाची उभारणी ,गोशाळेची पुनर्बांधणी ,रस्ता आदी कामे चालू असून ते प्रगतीपथावर आहेत. असे सांगून यावर्षी मठस्थापनेला बारा वर्षे पूर्ण झाली. तपपूर्ती व दासनवमी उत्सहानिमित्त शंकराचार्यांचे आगमन झाले व आम्हाला आशीर्वाद आम्हाला दिले. त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त केले. या दासनवमी उत्सवात वेगवेगळ्या जिल्ह्यातून भक्त व शिष्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित झालेत.
