अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
छत्रपती शिवराय छत्रपती शंभुराजे यांचे विचार व आचार मनामनात रुजू देत साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत
कोंढवे धावडे – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त कोंढवे धावडे येथे छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचे पूजन करत शिवकन्या प्रचिती राऊत हिच्या शिवगर्जनेने शिवजयंती साजरी करत संघर्ष चॅरिटेबल ट्रस्टचे उद्घाटन आई वडील श्री. संजय वाकडकर सौ. आशा वाकडकर व मा.जि.प. सदस्या सौ. अनिताताई इंगळे, राष्ट्रवादीचे नेते त्रिंबक मोकाशी भाजपा नेते उमेश भाऊ सर पाटील, मा. सरपंच नितीन भाऊ धावडे उद्योजक श्री नितीन जी कानिटकर श्री. अशोक चतुर्वेदी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले, तसेच छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त संघर्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर कोर्सेस, करियर गायडन्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, बालसंस्कार वर्ग आणि गरीब सामान्य जनतेसाठी अनिश ऑनलाईन सर्विस सेंटर याचां ही उद्घाटन सोहळा संपन्न झाला…*
*यावेळी अ.भा. छावा संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष शरद नाना कुंभार, शिवसेना नेते संतोष दादा शेलार, आय.काँग्रेसचे ख. म. संघ अध्यक्ष उमेश भाऊ कोकरे, संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत महाजन, कार्याध्यक्ष शिवाजी तात्या धावडे, आदित्य वाकडकर, सा.का. प्रकाशजी गायकवाड, श्रीरंग गायकवाड, कपिल पाटील, सुधीर धावडे, सौ स्वातीताई महाजन, सौ. आशाताई धावडे सौ. निकिता वाकडकर, रिद्धी वाकडकर, अश्विनी गोळे, सुस्मिता पोतदार, स्मिता पोतदार, सौ. अमिता राऊत व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते..*
*या कार्यक्रमाचे आयोजन संघर्ष चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक / अध्यक्ष साहित्यरत्न डॉक्टर गणेश राऊत तसेच अखिल भारतीय छावा संघटना व पदाधिकारी यांनी केले होते..*
*ज्यांच्या स्पर्शाने पवित्र झाली ही माती ज्यांच्या नावाने फुगते गर्वाने छाती असे आमचे दैवत राजा छत्रपती आणि या छत्रपती शिवरायांच्या जयंती दिनी संघर्ष चॅरिटेबल ट्रस्टने अतिशय आगळावेगळा उपक्रम अर्थात विद्यार्थ्यांसाठी कमी फी मध्ये कॉम्प्युटर कोर्सेस व गरीब सामान्य जनतेसाठी अत्यंत अल्प दरात ऑनलाइन सर्विसेस चालू करून सामान्य जनतेचे देण लागतो आणि छत्रपती शिवरायांचा वारसा खऱ्या अर्थाने या स्वराज्यात जनता कशा पद्धतीने सुखी राहील मुले कशी आपल्या क्षेत्रात पुढे जातील याची खऱ्या अर्थाने दखल संघर्ष चॅरिटेबल ट्रस्टने घेतली आहे असे मत दिव्यांगरत्न जि. पं. सदस्या सौ. अनिता ताई इंगळे यांनी व्यक्त केले..*
*संस्थेच्या वतीने किरण दगडे यांनी सर्वांचे मनस्वी आभार मानले…
