अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी सतीश कडू
महावितरण कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
नागपूर, दि. 19 फेब्रुवारी 2025: – शिवजयंतीचे औचित्य साधून महावितरणच्या विद्युत भवन कार्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते करण्यात आले,
मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा झालेल्या या अर्धकृती पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाप्रसंगी चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता हरिश गजबे, अकोला परिमंडलाचे नवनियुक्त मुख्य अभियंता राजेश नाईक व नागपुर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, पुतळा उभारणित मोलाचे सहकार्य करना-या स्थापत्य विभागातील अभियंते, पुतळा उभारणिची संकल्पना प्रत्यक्षात आणनारे मधुकर सुरवाडे आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेत महत्वाची भुमिका बजाविणा-या अंजली देशपांडे यांचा यथोचित सत्कार देखिल यवेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी वर्कर्स फ़ेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा, अधीक्षक अभियंते मंगेश वैद्य, मधुकर घुमे व अमित परांजपे, कार्यकारी अभियंते संजय श्रृंगारे व राजेश घाटोळे, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अतुल राऊत, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसुदन मराठे, सहायक मुख्य महाव्यवस्थाफक (मानव संसाधन) महेश जाधव, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर यांचेसह सुजित पाठक, सुशांत श्रुंगारे, अविनाश अंबादे, बंटी बडगे, राजेश पोफ़ळी, पिरुसिंग राठोड, अमित पेढेकर, सोनु बारसागडे, स्वप्निल टाकळीकर, दामोधर चंगोले, अमरदीप बागडे, रमेश वाटकर, लक्षमण वैरागडे, मधुकर सुरवाडे, संतोस हिरुळकर, महिंद्र पाचघरे, मनोज मेश्राम, प्रकाश निकम, मोहन चोरे, रिता ठाकरे, मनिषा चोकसे व विविध संघटनांचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फ़ोटो ओळ – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणा पश्चात अभिवादन करतांना महावितरणचे अधिकारी व विविध संघटना पदाघिकारी
