अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मराठा महासंघाच्या वतीने शिवजयंती साजरी
परभणी / प्रतिनिधी गोपाळ भालेराव
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने अभिवादन तसेच मोटर सायकल रॅली काढून 19 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी करण्यात आली.
अखिल भारतीय मराठा महासंघ परभणी जिल्हा शाखेच्या वतीने 19 फेब्रुवारी 2025 रोजी कृषी नगर येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचा समाज निर्माण व्हावा यासाठी जनजागृती व्हावी म्हणून मोटार सायकल रॅलीचे आयोजन कृषी नगर म्हाडा वसाहत शांतिनिकेतन कॉलनी गंगाखेड उडान पूल बस स्थानक रेल्वे स्टेशन जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गे काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
या कार्यक्रमास धाराजी भुसारे, संदीप गव्हाणे, भानुदासराव शिंदे, रमेशराव भिसे, विजय चट्टे, राजेश शिंदे, अशोक गिराम, द्वारकादास टेहरे, बाळासाहेब पवार, आसाराम शेळके, बाबाराव गाडगे, विठ्ठलराव देशमुख, अविष्कार पवार, शुभम गव्हाणे सह अनेक शिवभक्त सहभागी झाले होते.
