अजिंक्य महाराष्ट्र न्यूज : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमीत्त पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील लक्ष्मीरोड, शिवाजीरोडवरुन मिरवणूका निघत असतात. तसेच शिवजंयती निमित्त ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे आयोजन केले असून, यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.
मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे भारतीय इतिहासातील सर्वात शूर आणि कुशल योद्ध्यांपैकी एक आहेत. त्यांच्या शौर्याची गाथा इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिली आहे. ते केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात शौर्याचे उदाहरण आहेत. आता उद्या, 19 फेब्रुवारी रोजी देशभरात शिवजयंती (Shivjayanti 2025) साजरी होत आहे. बुधवारी होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्त, पुणे शहर वाहतूक पोलिसांनी शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक वळवण्याची आणि रस्ते बंद करण्याची घोषणा केली आहे, जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमीत्त शहरातील मध्यवर्ती भागातील लक्ष्मीरोड, शिवाजीरोडवरुन मिरवणूका निघत असतात. तसेच शिवजंयती निमित्त ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे आयोजन केले असून, यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर भागातील प्रामुख्याने जंगली महाराज रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड, बाजीराव रोड, कुमठेकर रोड, केळकर रोड व इतर रोडवर वाहतूक वाढून, सदर रोडवर वाहतुकीची कोंडी होऊन वाहतुक संथ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर ठिकाणी वाहतुक सुरक्षीत व सुरळीत राहणेकरीता सदर परिसरात वाहतूक बदल करण्यात येत आहेत.
कर्वे रोड, कोथरुडकडून येणाऱ्या वाहनांनी अलका टॉकीज चौक येथून डावीकडेवळून नदी पात्रातील पार्किंग येथे पार्क करतील (व्ही.आय.पी./ संयोजक / क्रीडा अधिकारी यांची वाहने फर्ग्युसन कॉलेज ग्राऊंड येथे पार्क करावीत.)
स्वारगेट, हडपसर, दांडेकर पूलकडून येणारी वाहने सेनादत्त मार्गे अलका टॉकिज चौक येथून उजवीकडे वळून नदी पात्रातील पार्किंग येथे पार्क करतील.
पुणे विद्यापीठ, पाषाण, बाणेर इ. रोडने येणारी वाहने विद्यार्थी यांना सिमला ऑफिस चौकात सोडून यु टर्न करुन वाहने ॲग्री कॉलेज ग्राऊंड येथे पार्क करतील. (हेही वाचा: Delhi 98th Marathi Sahitya Sammelan: येत्या 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत होणार 98 वे मराठी साहित्य संमेलन; PM Narendra Modi यांच्या हस्ते उद्घाटन, जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम)
शिवजंयती मुख्य मिरवणूक मार्गावरील वाहतूक बदल-दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 6 वा. पासून गर्दीसंपेपर्यंत लक्ष्मी रोड, शिवाजी रोड, बाजीराव रोडवरील सर्व प्रकारच्या वाहतूकीत खालीलप्रमाणे बदल असेल.
🛑दिनांक १९/०२/२०२५ रोजी श्री.छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त तसेच “जय शिवाजी जय भारत “पदयात्रे अनुषंगाने शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्थेतील बदलाबाबत प्रसिद्धीपत्रक.
