अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
व्हॅलेंटाईन डे ला जालन्यात थरार:- प्रेयसीचा खून करून मृतदेह घरात पुरला, कदीम जालना पोलिसांनी प्रियकराच्या मुसक्या आवळल्या,
संभाजी पुरीगोसावी (जालना जिल्हा) प्रतिनिधी.
जालना शहरांतील जमुनानगर भागात राहणारी तरुणी मोनिका सुमित निर्मळ (वय 30) ही छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या आयुष्मान रुग्णालयात आरोग्यसेविका म्हणून कार्यरत होती, गेल्या काही दिवसांपासून आपल्या पतीपासून ती विभक्त राहत असुन, मोनिका निर्मळ ही माहेरी आईसमवेत वास्तव होती, रेल्वेने दररोज छत्रपती संभाजीनगर येथे अपडाऊन करून ड्युटीला जात होती, मात्र तिचे ड्युटीवर जात असताना रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमध्ये शेख इरफान शेख पाशा (वय 30) यांच्याबरोबर प्रेमसुत जुळले होतं, मात्र (दि. 6) फेब्रुवारी रोजी रात्री उशिरापर्यंत जालन्यात घरी परत आधीच नाही तिचा मोबाईलही लागत नव्हता त्यामुळे चित्तूर झालेल्या आईने दुसऱ्या दिवशी थेट कदीम जालना पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली होती, दोन दिवसांपूर्वी मोनिकाच्या मोबाईलवरून तिच्या नातेवाईकांना मी सुखरूप असून मी लग्न केले आहे, आता मी तुम्हांला एक वर्षानंतरच भेटायला येईन असा आशयाचा खोटा मेसेज दिला होता, त्यामुळे नातेवाईकांच्या मनातही शंका निर्माण झाली होती, नातेवाईकांनी थेट पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल यांची भेट घेवुन या प्रकरणात तात्काळ लक्ष घालण्याची मागणी केली होती, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल यांनी याप्रकरणी कदीम जालना पोलिसांना तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना देताच पोलिसांची तपासाची चक्रे चांगलीच गतिमान करीत अखेर जालना जिल्ह्यात व्हॅलेंटाईन डे दिवशीच प्रियकराने प्रेयसीचा शेवट केला केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे, कदीम जालना पोलिसांनी शिलेगांव पोलिसांच्या मदतीने प्रियकरांच्या मुसक्या आवळल्या आहेत, शेख इरफान शेख पाशा (वय 35) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे, सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल कदीम जालना पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नांगरे दिलीप गायकवाड शेख अन्सारी तसेच शिलेगांव पोलिसांच्या मदतीने ही कामगिरी केली आहे,*
