अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
संपादकीय
वसुंधरा परिवारच्या संस्थापिका योगिता गोसावी शिवरकर यांचा शिवजयंती निमित्ताने शिवपूजन सोहळ्यात गौरव
आम्ही पुणेकर या संस्थेचे अध्यक्ष मा हेमंत भाऊ जाधव व संस्थेचे पदाधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती जगभर पोहचवण्यासाठी शिवस्मारक निर्मितीच्या माध्यमातून शिवचरित्राचा जगभर प्रसार करण्याचे महान कार्य करत आहेत. जपानची राजधानी टोकियो येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या भव्य स्मारकाचे पूजन व आरती सोहळा गणेश कला क्रिडा मंच येथे आयोजित करण्यात आला होता. या ऐतिहासिक सोहळ्यात
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत शिवप्रेमी व्यक्तींचा गौरव करण्यात आला. वसुंधरा परिवार ग्रुपच्या संस्थापिका योगिता गोसावी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला. आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत भाऊ आपले शतशः आभार व आपल्या या अनमोल कार्यास लक्ष लक्ष शुभेच्छा.
माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे माझे प्रेरणा स्थान आहेत माझे दैवत आहे आणि शिवजयंतीच्या आधी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा मिळणे माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. खूप पुण्य केले असेल म्हणून हा सन्मान आज अनेक मान्यवरांच्या हस्ते मिळाला असे मनोगत योगिता गोसावी यांनी व्यक्त केले. या सोहळ्यात मा डॉ श्री कराड, मा श्री प्रदीप रावत, मा श्री पांडुरंग बलकवडे, अध्यक्ष मा श्री हेमंत जाधव व अनेक मान्यवर उपस्थित होते. इव्हेंट व्यवस्थापक विशाल भाऊ कंठाळे आपले मनापासून धन्यवाद.
या ऐतिहासिक सोहळ्यात वसुंधरा परिवारच्या सविता हिंगणे, वर्षा तांबोळी, अश्विनी निकम, वंदना जैन, शुभांगी पाटील, उमा धनकवडे, उषा वाणी, लक्ष्मी वेताळ, मिनल जोशी, राधिका शिंदे, राधिका मेड, रेखा खिरीड, इशा शिर्के, शलाका बेहरे, नमिता दगडे, दीपाली राऊत, सुजाता पिठले, संजना, सुधा गायकवाड, मनिषा शिंदे, अंजना शिंदे, पार्वती भिसारे, पंचशीला कदम, लता कांबळे व कल्पना भोसले ई महिला उपस्थित होत्या.
