वडिलासुरा येथील राजेश पिठोरे यांनी उभारलेला प्राचीन,परंपरागत संस्कृती दर्शवणारा भव्य वाडा ठरत आहे सर्वांचे आकर्षणाचे केंद्र
जालना जिल्हा प्रतिनिधी हनुमंत दवंडे
महाराष्ट्र हा आपल्या अनोख्या जगविख्यात संस्कृतीसाठी ओळखला जातो. प्राचीन, परंपरागत शिल्पकलेचे उत्तम प्रतीक असणारे किल्ले,भव्य शिल्प, मंदिरे,बारव,धरणे आजही प्राचीन संस्कृतीस नमन करण्यास भाग पाडतात.
प्राचीन,वैभवशाली महाराष्ट्राच्या संस्कृतीत “वाडा” ही संस्कृती देखील डोळे दिपवणारी आहे. वाडा हा महाराष्ट्र विकसित झालेल्या परंपरागत निवासस्थानाचा प्रकार आहे. शेकडो वर्षांपूर्वी बांधलेले वाडे आजही ग्रामीण भागात ऊन,वारा, पाऊस आपल्या चिरेबंदी भक्कम तटबंदीवर झलक, एकत्र कुटुंब पद्धतीत जिव्हाळ्याचे,आपुलकीचे नाते पिढ्यानु पिढ्या टिकवत दिमाखात उभे आहेत. तर काही ठिकाणच्या परिवाराने शहराची वाट धरली असल्यामुळे प्राचीन वाड्यांची पडझड झाली आहे.
आजच्या युगात निवासस्थानाचे रूप बदलले आहे, बंगला,रो हाऊस,व्हिला,अपार्टमेंट असे आधुनिक तंत्रज्ञाने युक्त निवासस्थाने सर्वत्र दिसून येतात. मात्र वडी लासुरा येथील प्रगतिशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते सुनील पिठोरे यांनी प्राचीन,परंपरागत, वैभवशाली भव्य वाडा बांधला असून तो सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. अतिशय सुरेख, सुबक आणि डोळ्याचे पारणे फेडणारा वाडा पाहून सुनील पिठोरे यांच्या या आदर्श व वेगळ्या विचार प्रत्यक्षात अमलात आणण्याबद्दल कौतुक केले जात आहे.
महाराष्ट्रातील व राजस्थानातील कुशल कारागिरांनी अत्यंत लक्षवेधकपणे हा वाडा निर्मिती केला आहे.परंतु वास्तविक याचे शिल्पकार आहेत स्वतः सुनील पिठोरे. त्यांना स्वतः फिरण्याची अत्यंत आवड असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक प्राचीन स्थळांना ते भेट देत असतात त्यातच अनेक ठिकाणच्या प्राचीन वाड्याचे अवलोकन त्यांनी केले. कसल्याही प्रकारची इंजिनियर द्वारे डिझाईन तयार न करून घेता त्यांनी व त्यांच्या परिवारातील इतर सदस्यांच्या शोधक नजरेतून विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारची परंपरागत वाडा संस्कृतीस बाधा निर्माण होणार नाही याची पुरेपूर काळजी घेत उभारलेला हा वाडा पाहण्यास पंचक्रोशीतील त्याचबरोबर दूरवरून लोक येत वाडा बांधण्यामागची कल्पना माहिती करून घेत आहेत.
बदलता महाराष्ट्र न्यूज चॅनलचे प्रतिनिधी अनिल भालेकर सर यांनी स्वतः या वाड्याचे विशेष चित्रीकरण करून महाराष्ट्रातील प्रेक्षकांना हा वाडा पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
आणि खरंतर हा वाडा पाहून “जुने ते सोने” हि म्हण तंतोतंत खरी ठरते.
अतिशय सुबक,आकर्षक, भव्य पर्यावरण पूरक व आरोग्यवर्धक वातावरण देणारा वाडा उभारत त्याचबरोबर एकत्र कुटुंब पद्धतीचे प्रतीक असणारा वाडा उभारण्याबरोबरच महाराष्ट्रातील प्राचीन संस्कृतीचे जतन करण्याचे एक आदर्श कार्य केल्याबद्दल सुनील पिठोरे यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
