अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
कर्तुत्वाने साध्य केलं दिल्लीत रोप्य पदक पटकावल – साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत.
कोंढवे धावडे – दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय किक
बॉक्सिंग स्पर्धेत कोंढवे धावडे गावाची सुकन्या मंजिरी गणेश धावडे हिने रोपे पदक पटकावत कोंढवे धावडे गावाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोहत कोंढवे धावडे गावाचे नाव रोशन केलं आहे…
*तिने केलेल्या पराक्रमामुळे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत तात्या धावडे, राजेंद्र धावडे, विलास ढंम, नथुराम वांजळे, सुधीर धावडे, यांनी तिच्या भावी क्रीडा क्षेत्रास शुभेच्छा देत तिने असंच आपलं आणि आपल्या गावाचं नाव रोशन करावं अशा शुभेच्छा दिल्या..
एका सामान्य पण असामान्य कुळात जन्माला जन्माला आलेली मंजिरी कसलाही सपोर्ट नसताना कोणाचाही पाठबळ नसताना सोबळावरती आज आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत रोपे पदक मिळवते आणि आपलंच नव्हे तर आपली कर्मभूमी आणि जन्मभूमी असलेले कोंढवे धावडे गावाचे नाव रोशन करते म्हणजे नवल नाही तर मंजिरी अव्वल आहे असं मत यावेळी साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत यांनी व्यक्त केले..
