अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
आमचा एकही दलित समाजाचा कार्यकर्ता माजी आमदार जेथलिया यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला नाही
काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष बाळासाहेब अंभीरे
====================
गेल्या दहा वर्षापासून ग्रामपंचायत ही स्थानिक बहुजन विकास आघाडीची ग्रामपंचायत आहे
त्यामुळे जेथलियांचा दावा खोटा
अंभीरे यांचा आरोप
====================
प्रतिनिधी नामदेव मंडपे
ज्यांच्यावर 302 सह परतुर न्यायालयात सत्तावीस खटले दाखल आहेत असे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया हे काँग्रेस पक्षातून गेल्यामुळे आनंद झाला असून, भ्रष्टाचारी जेथलियांसोबत आमचा मागासवर्गीय समाजातील एकही कार्यकर्ता गेला नसल्याचे काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब आंभीरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे
ज्यांनी पक्षाशी गद्दारी करत बंडाचा झेंडा हाती घेऊन निवडणूक लढवली होती, मात्र माझ्यासारखे अनेक निष्ठावान कार्यकर्ते, पक्षासोबतच राहिले
वाटुर येथील ग्रामपंचायत गेल्या पंचवीस वर्षापासून काँग्रेसच्या ताब्यात आहे असे धादांत खोटे बोलत आहे मात्र प्रत्यक्षात गेल्या पंचवार्षिक पासून स्थानिक स्तरावरील बहुजन विकास आघाडी नावाची सर्वपक्षीय आघाडीची ही ग्रामपंचायत असून जेथलिया यांच्या ताब्यात ही ग्रामपंचायत कधी होती जेथलिया यांनी उत्तर द्यावे असेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे
ज्यांना आम्ही नेते म्हणून समजत होतो असे उपसरपंच बद्रीनारायण खवने यांनी माजी आमदार जेघलिया यांच्या डोळ्यात धुळपेकरत गेल्या अनेक वर्षापासून ही ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आहे असे दर्शविल्याचे दुःख होत असून गेल्या दहा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना काँग्रेस या सर्वच पक्षांतून सर्वसामान्य बहुजन विकास आघाडी निर्माण करून आम्ही ग्रामपंचायत लढवली होती त्यामुळे जेथलिया यांनी खोटा दावा करू नये असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे
मी काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचा जिल्हाध्यक्ष असून माझ्यासोबत पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे वेळोवेळी मानहानी झाली मात्र कालही मी पक्ष सोबत होतो आजही पक्ष सोबत असल्याचे सांगतानाच , आपण काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून, सगळी काँग्रेस वेठीस धरणाऱ्या माजी आमदार जेथलिया यांनी वाटुर ग्रामपंचायत वर दावा केल्याने आपण अस्वस्थ झालो असून चेथलिया यांची ही दादागिरी खपवून घेणार नसल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे
