अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी गणेश तळेकर
परम पूज्य सद्गुरु श्री भाऊ महाराज वेल्हाळ यांच्या शुभ आशीर्वादानं… रसिका थिएटर्स निर्मित, अर्चना थिएटर्स प्रकाशित, प्रियंका दत्तात्रय सादर करत आहे बा अर्थात रयतेचा राजा शिवबा
महाराष्ट्राची ख्याती जगभर पसरविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने शिवाजी महाराजांची गुणवैशिष्ट्ये सांगणारा संगीत-नृत्य-नाट्यात्मक उत्सव अर्थातच
रयतेचा राजा शिवबा
शिवाजी महाराजांचा इतिहास जर कोळून प्याल तर जगावर राज्य कराल हे केवळ एक वाक्य नाही शाश्वत सत्य आहे. जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्नं अंकुरायला लागलं त्या राजमाता जिजाऊ, ज्यां महापुरुषाच्या संकल्पनेतून मातीशी घट्ट नाळ जोडून स्वप्नं वाढू लागलं ते राजे शहाजी राजे, ज्या वारसदारानं हे देखणं स्वप्नं सत्यात उतरवलं ते राजे शिवछत्रपती अणि ज्या वारसदारानं हे देखणं स्वप्नं आपल्या खांद्यावर पेललं ते राजे शंभू छत्रपती या महापुरुषांना आम्हा कलाकारांकडून वंदन.
तरुण पिढी आज नशेच्या आहारी का जातेय, वाईट संगतीत बरबाद का होतेय, निर्णय का चुकतात
त्यांना दिशा दाखवणारा शिवबा का जन्मास येत नाही, ह्या अशा अनेक प्रश्नांचा मागोवा म्हणजेच *रयतेचा राजा शिवबा
